कमालच म्हणायची! चुरा करून खाल्ला 64 लाखांचा हिरा, X-Rayनं शोधला चोर

कमालच म्हणायची! चुरा करून खाल्ला 64 लाखांचा हिरा, X-Rayनं शोधला चोर

चोरानं हिऱ्याची तस्करी करण्यासाठी पोटात 297 ग्रॅम हिरा चुरा करून लपवला.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 जानेवारी : एखाद्या गोष्टीची तस्करी करण्यासाठी लोकं काय काय शक्कल लढवतील सांगता येत नाही. अशीच एक धक्कादायक बाब समोर आली आहे, ज्यात एका आफ्रिकेच्या चोरानं हिऱ्याची तस्करी करण्यासाठी पोटात 297 ग्रॅम हिरा चुरा करून लपवला.

गल्फ न्यूजच्या वृत्तानुसार, ही घटना संयुक्त अरब अमिरातीची आहे, फेडरल कस्टम अ‍ॅथॉरिटीने (एफसीए) काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला अटक केले. या व्यक्तिनं चक्क हिऱ्यांचा चुरा करून तो खाल्ला. पोलिसांनी या चोराचा एक्स रे काढल्यानंतर यात हा धक्कादायक प्रकार समोर आला.

वाचा-‘मॅच जिंकला नाही तर...’, दिग्गज क्रिकेटपटूला पत्नीनं दिली धमकी; VIDEO VIRAL

वाचा-चाहत्याच्या आगाऊपणामुळे सारा अली खान घाबरली , नेमकं काय घडलं पाहा VIDEO

जेव्हा ती व्यक्ती शारजाह विमानतळावर आली तेव्हा त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला. त्यानंतर त्याच्या बॅगची झडती घेतल्यानंतर एक्स-रे काढण्यात आला. त्यानंतर काय घडले ते पाहून अधिकाऱ्यांची झोप उडाली.

वाचा-कॉलेजमध्ये विद्यार्थिनीच्या बॅगेत सापडली Lipstick, शिक्षकाने रॉडने केली मारहाण

एक्स रे केल्यानंतर अधिकाऱ्यांना या प्रवाशाच्या पोटात 297 ग्रॅम कच्चा हिरा सापडला. ज्याची किंमत 90 हजार डॉलर (64 लाख रुपये) आहे. अहवालानुसार, त्या व्यक्तीने युएईमध्ये हिरासाठी संभाव्य खरेदीदार शोधले होते. त्याच्याकडे सध्या चौकशी केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 10, 2020 05:49 PM IST

ताज्या बातम्या