जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बापरे! झोपलेल्या व्यक्तीच्या शेजारी येऊन बसले 3 चित्ते, मग जवळ गेले अन्..., VIDEO पाहूनच उडेल थरकाप

बापरे! झोपलेल्या व्यक्तीच्या शेजारी येऊन बसले 3 चित्ते, मग जवळ गेले अन्..., VIDEO पाहूनच उडेल थरकाप

बापरे! झोपलेल्या व्यक्तीच्या शेजारी येऊन बसले 3 चित्ते, मग जवळ गेले अन्..., VIDEO पाहूनच उडेल थरकाप

एक माणूस त्याच्या तीन पाळीव चित्त्यांसोबत दिसत आहे. यादरम्यान एक चित्ता या व्यक्तीला मिठी मारून झोपलेला दिसतो. त्यानंतर…

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 20 मार्च : जगभरातील लोकांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पाळले आहेत. मात्र कुत्री आणि मांजर सामान्यतः बहुतेकांच्या जवळ दिसतात. याशिवाय गाई, म्हैस, गाढव, हत्ती, घोडे, बकरी यांसारखे प्राणी पशुपालनासाठी पाळले जातात. या प्राण्यांचे माणसांवरील प्रेमच त्यांना पाळीव प्राणी बनण्यास मदत करतं. आजकाल याच प्रेमापोटी माणूस काही भयानक प्राण्यांनाही पाळीव प्राणी बनवत आहे. जे पाहून यूजर्सलाही घाम फुटला आहे. ..जेव्हा पाकिस्तानी बिबट्या भारतात घुसतो; बजरंगी भाईजान स्टाईलमध्ये तारांखालून एन्ट्री, VIDEO अलीकडच्या काळात काही लोक आपल्या पाळीव प्राण्यांचा छंद थोडा पुढे नेताना दिसतात. काही लोक चक्क सिंह, वाघ, बिबट्या असे धोकादायक प्राणी पाळताना दिसतात. नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक माणूस त्याच्या तीन पाळीव चित्त्यांसोबत दिसत आहे. यादरम्यान एक चित्ता या व्यक्तीला मिठी मारून झोपलेला दिसतो. त्यानंतर एकामागून एक तिन्ही चित्ते आपल्या मालकाचं प्रेम मिळवण्यासाठी आतुर झालेले दिसतात.

जाहिरात

सहसा मांजर किंवा कुत्रा त्यांच्या मालकांसोबत असं कृत्य करताना दिसतात. मात्र यात चक्क चित्तेच मालकावर प्रेम करताना पाहायला मिळतात. अशा परिस्थितीत हा व्हिडिओ सांगतो की, मानवाचा पाळीव प्राणी बनल्यानंतर कोणताही भयंकर प्राणी त्याला मारण्याऐवजी त्याचं प्रेम मिळवण्यासाठी उत्सुक असतो. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रात्री त्याच्या तंबूत झोपलेला दिसत आहे. जिथे त्याचे तीन पाळीव चिते दिसतात. जे हळू हळू मालकाला मिठी मारून झोपू लागतात. यादरम्यान, ती व्यक्ती घाबरण्याऐवजी अत्यंत शांततेने त्यांना कुरवाळताना दिसते.

News18लोकमत
News18लोकमत

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्याला वृत्त लिहिपर्यंत 1 लाख 31 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 7 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओ पाहून युजर्सचा श्वास रोखला आहे. काही वापरकर्त्यांनी व्हिडिओवर आश्चर्यकारक कमेंट्स केल्या आहेत. व्हिडिओ पाहताना काही वापरकर्त्यांनी याला अतिशय गोंडस व्हिडिओ म्हणून वर्णन केलं आहे. त्याच वेळी, काही वापरकर्त्यांनी त्या व्यक्तीचं वर्णन खूप धाडसी असल्याचं केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात