जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Shocking! अवाढव्य मगरीच्या बाजूला झोपली व्यक्ती; VIDEO पाहूनच भरेल धडकी

Shocking! अवाढव्य मगरीच्या बाजूला झोपली व्यक्ती; VIDEO पाहूनच भरेल धडकी

मगरीसोबत झोपली व्यक्ती (फोटो - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब)

मगरीसोबत झोपली व्यक्ती (फोटो - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब)

मगरीसोबत झोपलेल्या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 24 जून : मगरीचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सिंह जंगलाचा राजा असला तरी पाण्यात मात्र मगरीचं राज्य असतं. त्यामुळे पाण्यातील मगरी ला सिंह आणि वाघ, बिबट्या असे खतरनाक प्राणीही घाबरतात. अशा मगरीशी पंगा घेण्याची हिंमत माणसाची होईल का? पण एका माणसाने ते केलं. तुम्हाला वाचूनच धक्का बसेल एक व्यक्ती चक्क मगरीच्या बाजूला जाऊन झोपली आहे. एक व्यक्ती एका अवाढव्य मगरीजवळ जाऊन झोपली. हा व्हिडीओ पाहून सर्वांना धडकी भरली आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता महाकाय मगर एका ठिकाणी शांत बसली आहे. एक व्यक्ती हळूच तिच्याजवळ जाते आणि झोपते. माणूस मगरीच्या शेजारी गेल्यानंतर ती किती मोठी आहे हे दिसतं. तिचा आकार पाहूनच आपल्याला धडकी भरते. धक्कादायक! मुलाला जबड्यात धरून पाण्यात नेलं, पण मगरीचाच मृत्यू; Shocking Video Viral अशा मगरीजवळ ही व्यक्ती झोपायला जाते. मगरीच्या शेपटीकडील भागाजवळ ती झोपते. मगरीचं तोंड त्या व्यक्तीच्या दिशेने नाही आहे. जर त्या मगरीने व्यक्तीला पाहिलं असतं, ती चवताळली असती तर या व्यक्तीचं काय झालं असतं, याची कल्पनाही नकोशी वाटते. @earth.reel नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुमच्या अशी हिंमत आहे का असं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये विचारण्यात आलं आहे.

जाहिरात

व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात