जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO - स्कूटीगर्ल आणि सायकलवाला एका छोट्याशा गल्लीत अडकले; पुढे जे घडलं ते पाहूनच झटका बसेल

VIDEO - स्कूटीगर्ल आणि सायकलवाला एका छोट्याशा गल्लीत अडकले; पुढे जे घडलं ते पाहूनच झटका बसेल

स्कूटी गर्ल - सायकलवाला आमनेसामने

स्कूटी गर्ल - सायकलवाला आमनेसामने

तरुणी स्कूटीवरून आणि तरुण सायकलवर बसून एका गल्लीत आमनेसामने आले. त्यानंतर जे घडलं त्याचा कुणी विचारही केला नसेल.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 20 मे : पापा की परी म्हणत स्कूटी गर्लचे कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका स्कूटी गर्लचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतो आहे. स्कूटी चालवताना एक तरुणी एका छोट्याशा गल्लीत अडकली. त्यात गल्लीत एक सायकलस्वार तरुण आला आणि त्यानंतर पुढे जे घडलं ते शॉकिंग आहे. एका छोट्याशा गल्ली स्कूटी गर्ल आणि सायकवाला अडकले. दोघंही एकमेकांसमोर होते. त्यानंतरच दृश्य मात्र थक्क करणारं आहे. हे संपूर्ण दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं. त्यात असं काही दिसलं की ते शेवटी व्हायरल होऊ लागलं. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही तोंडात बोटं घालाल. व्हिडीओत पाहू शकता एक छोटीशी गल्ली दिसते आहे. एक तरुणी या गल्लीत स्कूटीवर बसून येते पण ती तिथंच अडकते. त्याच गल्लीत समोरून एक तरुण सायकल चालवत येतो. तरुणी स्कूटी वाकडीतिकडी करून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. पण तिला ते शक्य होत नाही. सायकलस्वार तरुण तिची धडपड बघतो आणि तो आपल्या सायकलवरून उतरून तिच्या जवळ येतो. चित्रकार हत्ती! सोंडेने काढलं असं पेंटिंग की VIDEO पाहूनच थक्क व्हाल स्कूटीवरील तरुणी बाजूला होते. सायकलवरील तरुण तिची बाईक आपल्या दोन्ही हातांनी उचलतो. ती भिंतीवर लावतो आणि त्यानंतर तिचं तोंड दुसऱ्या दिशेला वळवतो. त्यानंतर तरुणी आपल्या स्कूटीवर बसून गल्लीतून बाहेर पडते. altu.faltu इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही व्हिडीओ नीट पाहाल तर त्यात तुम्हाला समजेल की स्कूटीवर बसलेली तरुणी खरंतर तरुणी नव्हे तर तरुणच आहे. असं प्रत्यक्षात काही घडलेलं नाही. हा व्हिडीओ फक्त मनोरंजनासाठी बनवण्यात आला आहे. यूनिक दिसावं म्हणून मानेवर गोंदवला टॅटू, काहीच तासात तरुणीची झाली अशी अवस्था हा व्हिडीओ पाहिल्यावर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. ही आहे मुलांची ताकद, प्रत्येक मुलगा लेजेंड असतो, अशा मजेशीर कमेंट येत आहेत.

जाहिरात

हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात