Home /News /viral /

हे कसं शक्य आहे? Lemon सोबत व्यक्तीने असं काही केलं की Video पाहून सर्वजण चक्रावले

हे कसं शक्य आहे? Lemon सोबत व्यक्तीने असं काही केलं की Video पाहून सर्वजण चक्रावले

लिंबाच्या वाढत्या दरांसह (Lemon price) आता लिंबाचा (Lemon magic video) हा व्हिडीओही चांगलाच चर्चेत आला आहे.

    मुंबई, 25 एप्रिल : जादूचे खेळ (Magic Video) पाहायला कुणाला आवडत नाही. जादू प्रत्यक्षात नसते तर जादूगरांची ती हातसफाई असते हे आपल्याला माहितीच आहे. सध्या अशाच एका जादूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ऐन उन्हाळ्यात वाढलेल्या लिंबाच्या दरांसह (Lemon price) लिंबाचा (Lemon magic video) हा मॅजिक व्हिडीओही चांगलाच चर्चेत आला आहे. व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण आहेत. हे कसं शक्य आहे, असाच प्रश्न सर्वांना पडला आहे. रस्त्यावर एक व्यक्ती लिंबाची जादू दाखवताना दिसतो आहे. त्याच्याकडे तीन लिंबू आहे. या तिन्ही लिंबूंसोबत तो काय करतो, नेमकं काय मॅजिक दाखवतो हे तुम्हीच पाहा. व्हिडीओत पाहू शकता व्यक्तीने ३ लिंबू आणि दोन मोठ्या वाट्या घेतल्या आहेत.  सुरुवातीला दोन्ही वाट्या उलट्या करून त्यांच्याखाली एकएक लिंबू ठेवतो. तिसऱ्या लिंबूवर तो आपल्या हातातील छडी फिरवतो. तो लिंबू गायब होतो. हे वाचा - OMG! सोशल मीडियावर या कावळ्याचं होतंय कौतुक! VIDEO पाहून नेटिझन्स थक्क त्यानंतर ती व्यक्ती वाटी उचलते तर त्या वाटीखाली एकाऐवजी दोन लिंबू असतात. त्यानंतर ही व्यक्ती पुन्हा ती वाटी उलटी ठेवते आणि दुसऱ्या वाटीकडून या वाटीपर्यंत रेघ ओढल्यासारखं करते. त्यानंतर त्या वाटीखाली तीन लिंबू असतात. शॉकिंग असा हा व्हिडीओ आहे. ही जादू प्रत्यक्षात पाहणारेही हैराण झाले आहेत. हे त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावावरून दिसूनच येतं आहे. @TheFigen नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. हे वाचा - काय सांगता! संपूर्ण ट्रक वरुन गेला तरीही अंडं सुरक्षित; हे कसं घडलं? पाहा VIDEO तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला. किंवा या व्यक्तीने नेमकी ही जादू कशी केली हे तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Viral videos

    पुढील बातम्या