• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • Shocking! 100 वर्षे जुन्या कबरीतून अचानक बाहेर आले मानवी केस; Horror Video पाहून तुम्हालाही फुटेल घाम

Shocking! 100 वर्षे जुन्या कबरीतून अचानक बाहेर आले मानवी केस; Horror Video पाहून तुम्हालाही फुटेल घाम

कबरीतून बाहेर आलेल्या केसांचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

 • Share this:
  वॉशिंग्टन, 17 सप्टेंबर :  कबरस्तानात गेल्यावर एखादी कबर (Grave) हलणं, कबरीतून आवाज येणं किंवा कबरीतून काहीतरी विचित्र बाहेर येणं फिल्मी वाटावा असा हा सीन (Horror movie). बऱ्याच हॉरर फिल्ममध्ये (Horror film) तुम्ही असं दृश्य पाहिलं असेल. समजा तुमच्यासमोर प्रत्यक्षात (Real ghost video) असं काही घडलं तर काय होईल. काय फक्त कल्पनेनेच घाम फुटला ना? (Horror video) अमेरिकेतील एका व्यक्तीने प्रत्यक्षात पाहिलेल्या अशाच भयानक (Shocking video) घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) शेअर (Viral video) केला आहे. कॅलिफोर्नियातील (California) 37 वर्षांचा जोएल मोर्रिसनने (Joel Morrison) कबरस्तानात भयानक अनुभव घेतला. त्याला एका कबरीतून मानवी केस बाहेर आलेले दिसले (Human hairs poking out 100 year old grave). त्याच्यासमोर खतरनाक घटना घडली. त्याने हा व्हिडीओ आपल्या टिकटॉक अकाऊंटवर शेअर केला. सॅक्रामेंटोतील (Sacramento) सेंट जोसेफ कॅथलिक सेमेन्ट्रीमध्ये (Saint Joseph's Catholic Cemetery) तो गेला होता. तिथं एका कबरीतून काहीतरी काळं बाहेर आल्याचं त्याला दिसलं. त्याला घामच फुटला. पण तरी ते नेमकं काय आहे ते पाहण्यासाठी तो त्या कबरीजवळ गेला. तिथं त्याला जे दिसलं ते पाहून तो ओरडलाच. कारण त्या कबरीतूनच चक्क मानवी केस बाहेर आले होते. हे वाचा - OMG! मृतदेहांचा मेकअप करते ही तरुणी; डेडबॉडीसाठीही ब्रँडेड प्रोडक्ट्स ही कबर सिमेंटची होती. त्याच्या किनाऱ्यावर भेगा पडल्या होत्या आणि या भेगांमधून हे केस बाहेर आले होते.  विशेष म्हणजे ही कबर 100 वर्षे जुनी होती. त्यामुळे त्यातून मानवी केस कसे काय बाहेर आले, याचं त्याला आश्चर्यच वाटलं. जर कबरीतून केस आधीच बाहेर आले असतील तर या शंभर वर्षांत तिकडे कुणाचंच लक्ष गेलं नाही का? त्याने ही संपूर्ण घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आणि हा व्हिडीओ आपल्या टिकटॉक अकाऊंटवर पोस्ट केला.  हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्सही शॉक झाले आहेत. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. काही जणांना हे मानवी केस नाही आहेत असं म्हटलं आहे. कबरीजवळ एखादं झाड असावं, ज्याची ही मुळं असावीत अशी शक्यता व्यक्त केली. पण आपण स्वतः कबरीजवळ जाऊन पाहिलं तर ते मानवी केसच होते, असं जोएलने सांगितलं.  कदाचित खारीने मृतदेहाचे केस कबरीतून बाहेर काढले असावेत, असा अंदाजही त्याने बांधला. हे वाचा - Horror video : 'ते' भूत की...? Gym मधील हे दृश्य पाहून दरदरून फुटेल घाम सर्वात खतरनाक म्हणजे जोएल पुन्हा इथं दुसऱ्यादिवशी आला तेव्हा हे केस कबरीबाहेर नव्हते. हा व्हिडीओसुद्धा त्याने सोशल मीडियावर शेअर केला. तुम्हाला काय वाटतं हे काय असू शकतं. कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया जरूर द्या.
  Published by:Priya Lad
  First published: