ज्या वस्तूंबद्दल माहिती नसेल त्या न विचारता हात लावू नये असं मोठी जाणकार मंडळी अनेकदा सांगत असतात. विशेषत: इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू वापरण्यापूर्वी त्याबाबत व्यवस्थिती माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. अन्यथा याची मोठी किंमत मोजावी लागते. अशीच काहीशी घटना इंग्लंडमध्ये घडली आहे. येथील एका तरुणाने चुकून स्टन गन (Stun Gun) खरेदी केली. इलेक्ट्रिक रेजर ( electric razor) समजून त्याने चक्क गनची खरेदी केली.
इंग्लंडमधील बोल्टनमध्ये राहणारा 26 वर्षीय मोहम्मद खान याने एक विचित्र स्टन गन खरेदी केली. त्याचा आकार इलेक्ट्रिक रेजरशी मिळताजुळता असल्याने त्याने ते खरेदी केलं. शस्त्र स्वत:कड़े बाळगण्याच्या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर बोल्टन क्राउन कोर्टमध्ये मोहम्मदला हजर करण्यात आलं. यावेळी तो म्हणाला, जेव्हा ही वस्तू खरेदी केली तेव्हा तिच्या वापराबद्दल मला माहिती नव्हती. सुदैवाने गन चालविल्यानंतरही मोहम्मद याला काही त्रास झाला नाही.
हे ही वाचा-लॉकडाऊनमध्ये घरबसल्या नको ते उद्योग;आता बॉसची भीती दाखवून प्रेयसी करते BlackMail
स्टन गनने दाढी करण्याचा प्रयत्न
मोहम्मद खानने न्यायालयात सांगितलं की, एक अज्ञानाने त्याच्याशी संपर्क केला होता. ज्यात त्याने इलेक्ट्रिक शेवर आणि चार्जरसह एक बॉक्स पाठवला. घरी परतल्यानंतर खानने डिव्हाइस प्लक केला आणि त्याने शेव्ह करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यात त्याला काहीही दुखापत झाली नाही. गेल्या वर्षी ग्रेटर मॅनचेस्टर पोलिसांनी टॅक्निकल अॅड युनिटने तपासणीदरम्यान खानच्या घरातून स्टन गन आणि त्याचं चार्जर जप्त केलं होतं.
स्वत:च्या बचावासाठी मोहम्मद खान याने सांगितलं की, डिव्हाइस चार्ज झाला नाही. त्यामुळे त्याने ही वस्तू कपाटात ठेवली. त्यानंतर तो याविषयी विसरला होता. त्याचं म्हणणं आहे की, ती गन असल्याचं त्याला माहिती नव्हतं. त्याने अशी गन कधीच पाहिली नव्हती. शस्त्र बाळगल्या प्रकरणी मोहम्मद खान याला दोन वर्षांची कंडिशनल डिस्चार्जची शिक्षा सुनावण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Gun firing