जाहिरात
मराठी बातम्या / Viral / चिमुकल्याच्या हातात दिलं लोडेड पिस्तूल; त्याने खेळणं समजून गोळी झाडली अन्.., हादरवणारा VIDEO

चिमुकल्याच्या हातात दिलं लोडेड पिस्तूल; त्याने खेळणं समजून गोळी झाडली अन्.., हादरवणारा VIDEO

चिमुकल्याने झाडली गोळी

चिमुकल्याने झाडली गोळी

ती व्यक्ती ते लोडेड पिस्तूल एका लहान मुलाच्या हातात देतो. यानंतर जे घडलं ते पाहून तुम्हाला धक्का बसेल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 05 जुलै : आजकाल लग्न समारंभ किंवा इतर कोणत्याही प्रसंगी तसंच कार्यक्रमांमध्ये फायरिंग करणं ही एक सामान्य गोष्ट होत चालली आहे. असं करून लोकांना एक प्रकारे आपण किती दबंग आहोत, हे दाखवायचं असतं. अशा प्रकरणांमध्ये अनेकवेळा पोलिसांकडून कारवाई होऊनही लोक हे पुन्हा पुन्हा करताना दिसतात. वरातीत डान्स करताना बंदूक घेऊन नाचणं किंवा गोळीबार करणं ही आता सामान्य बाब झाली आहे. हे करत असताना अनेकदा अपघातही झाले आहेत, ज्याचे व्हिडिओही समोर आले. मात्र तरीही लोक यातून धडा घेत नाहीत. आता असाच एक व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ लग्न समारंभाचा असल्यासारखा वाटतो, जिथे फायरिंगमुळे मोठी दुर्घटना घडली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक लहान मूल एका माणसावर गोळी झाडताना दिसत आहे. चेंबुरमध्ये रस्ता खचल्याचा धक्कादायक Video समोर, दुचाक्यांचा खच, कार कोसळतानाचे Live दृश्य या व्हिडिओमध्ये दिसतं की, एक व्यक्ती हातात लोडेड पिस्तूल घेऊन लहान मुलासोबत बसलेला आहे. त्या व्यक्तीला त्या पिस्तूलमधून गोळीबार करायचा आहे, पण तो ते करू शकला नाही. यानंतर ती व्यक्ती ते लोडेड पिस्तूल एका लहान मुलाच्या हातात देतो. यानंतर जे घडलं ते पाहून तुम्हाला धक्का बसेल.

जाहिरात

त्या मुलाच्या हातात पिस्तूल येताच त्याने ते खेळणं समजून गोळीबार सुरू केला. या गोळीबारात ज्या व्यक्तीने हे पिस्तूल मुलाच्या हातात दिलं होतं, त्याला गोळी लागली. फायरिंग करताच धक्क्याने मुलगा जमिनीवर कोसळला. तर, अगदी जवळून गोळी त्या समोरच्या व्यक्तीच्या पोटात लागली. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ कुठल्यातरी कार्यक्रमाचा वाटतो. जिथे अचानक या घटनेमुळे आनंदाचं वातावरण दु:खात बदललं. जिथे लोक आनंदाने एकमेकांना भेटत होते, तिथे या गोळीबारानंतर लोकांमध्ये घबराट पसरली होती. आतापर्यंत 1.9 मिलियन लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. एका यूजरने या व्हिडिओवर ‘फादर ऑफ द इयर’ असं लिहिलं आहे. आतापर्यंत 17 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात