Home /News /viral /

क्या बात है! ना पोळपाट-लाटणं ना रोटी मेकर, चक्क हवेत पीठ उडवत त्याने बनवली चपाती; पाहा VIDEO

क्या बात है! ना पोळपाट-लाटणं ना रोटी मेकर, चक्क हवेत पीठ उडवत त्याने बनवली चपाती; पाहा VIDEO

चपाती करण्याची अनोखी स्टाईल पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत.

    मुंबई, 17 डिसेंबर : चपाती (How to make Chapati video) करायची म्हटली की पोळपाट लाटणं लागतं किंवा रोटी मेकर (How to make Roti video). पण एका व्यक्तीने मात्र कमालच केली आहे. या दोन्हीपैकी काहीच न वापरता त्याने चक्क हवेतच चपाती करून दाखवली आहे. चपाती करण्याची त्याची अनोखी स्टाईल पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. त्याचं हे कौशल्य अनेकांना आवडलं आहे. सोशल मीडियावर (Social Media) हवेत चपाती बनवणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल (Viral video) झाला आहे. हवेत चपाती बनवणारी ही व्यक्ती म्हणजे समोसा (Samosa video) विक्रेता आहे. हा समोसावाला समोश्यासाठी लागणारी चपाती लाटून नाही तर हाताने हवेत उडवत बनवतो. आता नेमकं हे तो कसं काय करतो ते तुम्हीच पाहा. व्हिडीओत पाहू शकता ही व्यक्ती मळलेल्या पिठाचा गोळा घेते त्याला टेबलवर आपटते. त्यानंतर टेबलवर तो पिठाचा गोळा आपटतो आणि हाताने पसरवताना दिसतो. त्यानंतर तेच पीठ हवेत उडवत टेबलवर आपटताना दिसतो. अरे हे काय चपाती तर तयार झाली. ही चपाती फोल्ड करून त्यावर तो समोश्यातील सारण ठेवतो आणि घडी करून त्याला समोश्याचा आकार देतो. हे वाचा - Desi Jugaad: हात न लावता शेण उचलण्याचा अजब जुगाड, शेतकऱ्याची ही ट्रिक झाली Viral Ch Mohd Saleem Badshah नावाच्या फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये एका युझरने दिलेल्या माहितीनुसार ही व्यक्ती हैदराबादची आहे. हैदराबादमध्ये अशाच पद्धतीने समोसे बनवले जातात. या व्यक्तीचं कौशल्य पाहून लोक त्याचे फॅन झाले आहेत. कुणी याला मशीन म्हटलं आहे तर कुणी जादूगार. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Food, Viral, Viral videos

    पुढील बातम्या