मराठी बातम्या /बातम्या /Viral /

'साहेब, घरचे माझं लग्न करत नाहीत'; अजब तक्रार घेऊन थेट पोलीस ठाण्यात पोहोचला तरुण अन् मग...

'साहेब, घरचे माझं लग्न करत नाहीत'; अजब तक्रार घेऊन थेट पोलीस ठाण्यात पोहोचला तरुण अन् मग...

'साहेब, माझे कुटुंबीय आणि नातेवाईक माझं लग्न करत नाहीत, त्यामुळे मी मानसिकदृष्ट्या वेडा होत आहे', असं या तरुणाने आपल्या तक्रारीत म्हटलं

'साहेब, माझे कुटुंबीय आणि नातेवाईक माझं लग्न करत नाहीत, त्यामुळे मी मानसिकदृष्ट्या वेडा होत आहे', असं या तरुणाने आपल्या तक्रारीत म्हटलं

'साहेब, माझे कुटुंबीय आणि नातेवाईक माझं लग्न करत नाहीत, त्यामुळे मी मानसिकदृष्ट्या वेडा होत आहे', असं या तरुणाने आपल्या तक्रारीत म्हटलं

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India

लखनऊ 23 नोव्हेंबर : मुलगा किंवा मुलगी लग्नाच्या वयात आले की, कुटुंबातील व्यक्ती आणि नातेवाईक त्यांचं लग्न करण्याची तयारी सुरू करतात. तुमच्यापैकी काहीजण तर लग्नाच्या गोष्टीला कंटाळलेलेदेखील असाल. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये याच्या अगदी विरुद्ध अडचण असलेला एक तरुण आहे. नातेवाईक आणि कुटुंबातील व्यक्ती लग्न करू देत नाहीत, अशी या 30 वर्षीय तरुणाची तक्रार आहे. 'साहेब, माझे कुटुंबीय आणि नातेवाईक माझं लग्न करत नाहीत, त्यामुळे मी मानसिकदृष्ट्या वेडा होत आहे. कृपया माझं लग्न लावून द्या,' असा विनंती अर्ज घेऊन एक तरुण ओराई कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गेल्याची घटना समोर आली आहे.

बापरे बाप! सर्पदंश झालेली व्यक्ती रुग्णालयात येताच सर्वांना फुटला घाम; उपचाराऐवजी सुरू झाली पळापळ

हा अर्ज घेऊन तरुण आल्यावर पहिल्यांदा पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित सर्व पोलीस हसले. तरीदेखील या तरुणाने प्रभारी निरीक्षकांना अर्ज देऊन लग्न लावून देण्याची विनंती केली आहे. प्रभारी निरीक्षकांनी त्याला आश्वासन देऊन घरी पाठवलं. जालोन तालुक्यातील शेखपूर गावातील रहिवासी शाहिद शाह यांचा मुलगा मिठू लग्नासाठी विनंती अर्ज घेऊन ओराई कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गेला.

अतिरिक्त प्रभारी निरीक्षक अरविंद यादव यांना त्याने अर्ज दिला. अर्ज देताना त्यानं सांगितलं की, त्याचं वय 30वर्षे आहे. मात्र, अद्याप त्यांचं लग्न झालेलं नाही. त्यामुळे तो आयुष्य जगण्याच्या हक्कापासून वंचित राहत आहे. तो बऱ्याच दिवसांपासून त्रस्त आहे. पण, घरच्यांनी आणि नातेवाईकांनी अजूनही त्याच्या लग्नाचा विचार केलेला नाही. त्यामुळेच तो मानसिकदृष्ट्या जास्त अस्वस्थ होत आहे. जर त्याचं लग्न झाले नाही तर तो मानसिकदृष्ट्या वेडा होईल. लग्नानंतर तो आपल्या जोडीदाराला नेहमी आनंदी ठेवेल. शिवाय, लग्न करून दिल्याबद्दल तो पोलिसांचा सदैव ऋणी राहील, असंही मिठूने सांगितलं.

नातवाने `हा` हटके प्रश्न विचारताच आजीने दिलं लाजून उत्तर; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

तरुणाची मानसिक स्थिती चांगली नाही!

मिठूचा विनंती अर्ज पोलीस स्टेशनमध्ये येताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पोलीस ठाण्याच्या अतिरिक्त प्रभारी निरीक्षकांनी त्याचा अर्ज वाचला. बसवून त्याच्या अडचणी ऐकून घेतल्यानंतर आणि लग्न लावून देण्याचं आश्वासनही दिलं. अर्ज मिळाल्यानंतर पोलिसांनी तरुणाच्या नातेवाईकांनाही बोलावलं. दरम्यान, हा तरुण मानसिकदृष्ट्या ठीक नाही, त्यामुळे तो नेहमी असे प्रकार करत असल्याचं नातेवाईकांनी सांगितलं. सध्या पोलिसांनी तरुण आणि कुटुंबीयांची समजूत घालून तरुणाला घरी पाठवलं आहे.

या प्रकरणी अतिरिक्त प्रभारी निरीक्षक अरविंद कुमार यादव यांनी सांगितलं की, तरुण अर्ज घेऊन आला होता. कुटुंबीयांची आणि त्याची समजूत घालून त्याला घरी पाठवण्यात आलं आहे. त्याच्यासाठी मुलगी शोधण्यासही सांगितलं आहे. जेणेकरून लग्न होईल आणि तो त्याच्या दुःखातून बाहेर पडू शकेल.

First published:

Tags: Marriage, Viral news