मराठी बातम्या /बातम्या /Viral /Shocking Video : फास्ट ट्रेन प्लॅटफॉर्मजवळ येताच तरुणीला मागून दिला धक्का; CCTV मध्ये कैद झालं भयंकर दृश्य

Shocking Video : फास्ट ट्रेन प्लॅटफॉर्मजवळ येताच तरुणीला मागून दिला धक्का; CCTV मध्ये कैद झालं भयंकर दृश्य

महिला ट्रेनची वाट पाहत प्लॅटफॉर्मवर उभी होती. ट्रेन जवळ येताच मागून तिला धक्का दिला.

महिला ट्रेनची वाट पाहत प्लॅटफॉर्मवर उभी होती. ट्रेन जवळ येताच मागून तिला धक्का दिला.

महिला ट्रेनची वाट पाहत प्लॅटफॉर्मवर उभी होती. ट्रेन जवळ येताच मागून तिला धक्का दिला.

नवी दिल्ली, 17 जानेवारी : रेल्वे स्टेशन (Railway Station) असो वा मेट्रो..नेहमीच ट्रॅकपासून दूर उभं राहण्याचा सल्ला दिला जातो. मात्र कधी कधी अशा काही घटना घडतात की ज्यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. जलद गतीने येणाऱ्या ट्रेनपासून लोक लांब उभे राहतात. मात्र ट्रेन जवळ येताच मागून कोणी धक्का दिला तर...(man pushed the woman in front of the train coming at high speed shocking Video)

अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Shocking Video Viral On Social Media) होत आहे. या व्हिडीओमध्ये प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या एका महिलेला मागून एक तरुण धक्का देतो, ज्यामुळे ती जलद गतीने येणाऱ्या ट्रेनच्या समोर जाऊन पडते.

महिलेला जाणून-बुजून ट्रेनसमोर ढकललं..

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रसेल्समध्ये एका व्यक्तीने महिलेला जाणून-बुजून जलद गतीने येणाऱ्या ट्रेनसमोर धक्का दिला. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

हे ही वाचा-रोमान्ससाठी प्रियकराला दिली दुसरीच तरुणी; रिलेशनमध्ये आला भलताच ट्विस्ट

आरटी वेबसाइटनुसार, ही घटना शुक्रवारी सायंकाळी बेल्जियमची राजधानी रोजियर मेट्रो स्टेशनवर घडली. सुदैवाने ट्रेन वेळेत थांबल्याने महिलेचा जीव वाचला. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल..

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, महिलेला मागे उभ्या असलेल्या एका तरुणाने धक्का दिला. यामुळे महिले थेट ट्रॅकवर पडली. रेल्वे चालकानेही वेळात आपात्कालीन ब्रेक दाबला म्हणून महिलेचा जीव वाचला. मात्र महिलेला या घटनाचा धक्का बसला आहे. त्यामुळे या प्रकारानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं.

First published:
top videos

    Tags: Railway accident, Shocking viral video