बाली, 02 नोव्हेंबर : लग्न करून वैताग आला आहे, असं बऱ्याच लोकांकडून तुम्ही ऐकलं असेल. एकच लग्न कित्येकांना नकोसं वाटतं, असं असताना एका व्यक्तीने मात्र तब्बल 87 लग्न केली आहेत आणि आता 88 व्यांदा लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. आश्चर्य म्हणजे तो पुन्हा लग्न करतो आहे, ते काही वर्षांपूर्वी घटस्फोट दिलेल्या एक्स-वाईफसोबत. इंडोनेशियातील लग्नाचं हे विचित्र प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे.
पश्चिम जाव्हातील मजेलेंग्कामध्ये राहणारा 61 वर्षांचा कान. आपल्या वयापेक्षा जास्त वेळा तर त्याने लग्न केलं आहे. वयाच्या साठीत त्याने 87 लग्न केली आणि आता 88 वं लग्न करायला जातो आहे. पण यावेळी तो कोणत्या नव्या महिलेला आपली बायको बनवणार नाही आहे. तर एक्स-वाईफशीच लग्न करणार आहे. ज्या बायकोला त्याने काही वर्षांपूर्वी घटस्फोट दिला होता, तिच्यासोबतच तो पुन्हा संसार थाटणार आहे.
हे वाचा - ड्रायव्हरने असा गिअर टाकला की प्रेमात पडली श्रीमंत पोरगी; तिच्याशी लग्न करून झाला करोडपतीचा घरजावई
जिच्याशी तो पुन्हा लग्न करणार आहे, ती त्याची 86 वी पत्नी होती. बऱ्याच कालावधीपूर्वी दोघं वेगळे झाले पण त्या दोघांमध्ये अद्यापही काहीतरी नातं आहे, ज्यामुळे ते दोघं पुन्हा एक होणार आहेत. कानने त्यावेळी आपल्या या पत्नीला एका महिन्यानंतर घटस्फोट दिला होता पण ती अद्यापही त्याच्यावर प्रेम करते. तिने जेव्हा त्याच्याकडे परत येण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा कान तिला नकार देऊ शकला नाही.
Tribunnews च्या रिपोर्टनुसार या व्यक्तीला प्लेबॉय किंग म्हणून ओळखलं जातं. मलय मेलच्या रिपोर्टनुसार वयाच्या 14 व्या वर्षी कानचं पहिलं लग्न झालं. त्याची पहिली पत्नी त्याच्यापेक्षा वयाने 2 वर्षे मोठी होती. लग्नाच्या दोन वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला कारण कानचा अॅटीट्युड तला चांगला वाटला नाही. कान सांगतो, महिलांना आवडणार नाही असं मी कधीच काही केलं नाही, कुणाच्याही भावनांशी मी खेळलो नाही.
हे वाचा - 66 वर्षाचा अब्जाधीश पडला 34 वर्षांच्या मीडिया इंफ्ल्यूएन्सरच्या प्रेमात; आता घेतला मोठा निर्णय
पहिल्या घटस्फोटापासून आतापर्यंत त्याने 87 लग्न केली आणि अद्यापही लग्न करणं सुरूच आहे. 87 बायकांपासून त्याला किती मुलं आहे, याची माहिती मात्र नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indonesia, Marriage, Viral, Viral news, Wedding