जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 66 वर्षाचा अब्जाधीश पडला 34 वर्षांच्या मीडिया इंफ्ल्यूएन्सरच्या प्रेमात; आता घेतला मोठा निर्णय

66 वर्षाचा अब्जाधीश पडला 34 वर्षांच्या मीडिया इंफ्ल्यूएन्सरच्या प्रेमात; आता घेतला मोठा निर्णय

फोटो

फोटो

प्रेमाला जात, धर्म, रंग, रुप, वय, देशांच्या सीमा या कशाचंच बंधन नसतं, असं म्हटलं जातं. हल्ली तर वयाच्या बाबतीत ही म्हण खरी करणाऱ्या अनेक घटना कानांवर पडत आहेत. अगदी विशीतली तरुणी साठीतल्या पुरुषाच्या प्रेमात पडली किंवा त्या उलट घटना बघायला मिळतात.

  • -MIN READ Trending Desk Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 29 ऑक्टोबर-  प्रेमाला जात, धर्म, रंग, रुप, वय, देशांच्या सीमा या कशाचंच बंधन नसतं, असं म्हटलं जातं. हल्ली तर वयाच्या बाबतीत ही म्हण खरी करणाऱ्या अनेक घटना कानांवर पडत आहेत. अगदी विशीतली तरुणी साठीतल्या पुरुषाच्या प्रेमात पडली किंवा त्या उलट घटना बघायला मिळतात. या प्रेम प्रकरणांतून अनेक जण त्यांच्या पहिल्या पार्टनरला सोडतात किंवा घटस्फोटही देतात. सध्या अशीच एक घटना चर्चेत आहे. एका उद्योगपतीचं सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरवर प्रेम जडलं आहे आणि तो तिच्यासाठी त्याच्या पत्नीला सोडणार आहे. अमेरिकन अब्जाधीश आणि उद्योगपती जॉन पॉलसन 66 वर्षांचे आहेत. त्यांना त्यांच्यापेक्षा 32 वर्षांनी लहान एक सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर इतकी आवडली की ते तिच्या प्रेमात पडले. या सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर व डायटिशियनचं नाव एलिना आहे. आपल्या डाएटबाबत सजग असलेली एलिना जॉन यांना इतकी आवडली, की तिच्यासाठी त्यांनी आपलं 21 वर्षांचं लग्नाचं नातं मोडण्याचा निर्णय घेतला. सध्या दोघं ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत असल्याचं कळतंय. या कपलचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, अब्जाधीश उद्योगपती जॉन पॉलसन यांची एकूण संपत्ती 4.8 बिलियन डॉलर म्हणजे सुमारे 24 हजार कोटी रुपये आहे. ते जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 177 व्या स्थानी आहेत. जॉन या सुंदर डायटिशियन, लाइफस्टाईल एक्सपर्ट आणि सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर एलिनाच्या प्रेमात पडले आहेत. दोघे आता मॅनहॅटनमधील एका लक्झरी अपार्टमेंटमध्ये एकत्र राहत आहेत. **(हे वाचा:** बेवफा चायवाला! ब्रेकअप झालेल्यांसाठी खास ऑफर; मिळणार डिस्काउंटमध्ये चहा ) जॉन यांची पत्नी जेनी पॉलसन 50 वर्षांची असून, दोघांच्या लग्नाला 21 वर्षे झाली आहेत. दोघांना दोन मुलीही आहेत. जेनीला तिच्या पतीच्या अफेअरची माहिती मीडियातून मिळाली आणि त्यानंतर तिने घटस्फोट मागितला आहे. दोघांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली आहे. आता जॉन यांना जेनीला घटस्फोटात पोटगी म्हणून मोठी रक्कम द्यावी लागणार आहे, पण जॉन यांना त्याची चिंता असल्याचं दिसत नाहीये. कारण ते एलिनासोबत त्यांचं नातं एंजॉय करत आहेत. जॉन यांना खाण्यापिण्याची प्रचंड आवड आहे, तर एलिना फिटनेस फ्रीक आहे. ती तिच्या डाएटची विशेष काळजी घेते. तिला कमी कॅलरीज असलेलं एनर्जी ड्रिंक्स प्यायला आवडतात. दोघांच्या विवाहबाह्य संबंधांच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. एलिना डी अल्मेडा फिटनेस एन्फ्लुएन्सर असून, जॉनशी भेट होण्यापूर्वी ती फक्त 9 हजार रुपयांना डाएट प्लॅन विकायची. दरम्यान, जॉन यांना एलिनाशी लग्न करून कुटुंब वाढवायचं आहे, असा दावा अनेक अमेरिकन मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. दरम्यान, लोक एलिनाला पैशांसाठी जॉनला डेट करत असल्याचं म्हणत ट्रोल करत आहेत. तर, जॉन यांची पत्नी त्यांच्या नात्याबद्दल कळाल्यानंतर संतापली असून, घटस्फोट मागण्यासोबतच त्यांनी पतीवर गंभीर आरोपही केले आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात