मराठी बातम्या /बातम्या /Viral /9 बायका फजिती ऐका! मजेमजेत एकाच वेळी केलं 9 जणींशी लग्न; आता झाला भलताच वांदा

9 बायका फजिती ऐका! मजेमजेत एकाच वेळी केलं 9 जणींशी लग्न; आता झाला भलताच वांदा

एकाच वेळी 9 जणींशी लग्न केल्यानंतर आता या व्यक्तीला समस्या उद्भवत आहेत.

एकाच वेळी 9 जणींशी लग्न केल्यानंतर आता या व्यक्तीला समस्या उद्भवत आहेत.

9 महिलांशी लग्न करून चर्चेत आलेली ही व्यक्ती तिच्या वैवाहिक आयुष्यातील समस्यांमुळे पुन्हा चर्चेत आली आहे.

ब्राझिलिया, 16 ऑगस्ट : एखाद्या व्यक्तीच्या दोन बायका असतील तर त्याची काय अवस्था होते हे काही वेगळं सांगायला नको. मग एखाद्याने एकाच वेळी 9 महिलांशी लग्न केलं असेल तर त्याचं काय झालं असेल याचा विचार तुम्ही केला आहे. 9 महिलांशी लग्न करून चर्चेत आलेली अशीच एक व्यक्ती आता पुन्हा चर्चेत आली आहे. त्याचं कारण आहे ते त्याचं वैवाहिक आयुष्य (Man married with 9 wives).

ब्राझीलमध्ये राहणारा आर्थर ओ उर्सो ज्याने गेल्या वर्षी नऊ महिलांशी लग्न केलं होतं. त्याच्या या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. कित्येक पुरुषांना आपलीही लाइफही आर्थरसारखी असावी असं वाटू लागलं. पण त्याच आर्थरच्या आयुष्यात असं काही खळबळजनक घडलं आहे की अशी आपण किती सुखी आहोत, याचं समाधान या पुरुषांना वाटेल. एकापेक्षा जास्त पत्नी ठेवण्याची इच्छा किंवा हौस असणाऱ्या पुरुषांसाठी आर्थरने नवा शॉकिंग खुलासा केला आहे.

हे वाचा - काय सांगता! आता डॉग मिळवून देईल तुम्हाला तुमची गर्लफ्रेंड; कसं ते पाहा

9 पैकी एका बायकोने त्याला सोडलं आता तो 8 पत्नींसोब राहत आहे. पण त्याचं आयुष्य आता पहिल्यासारखं नाही राहिलं. त्याने आपला अनुभव शेअर केला आहे.

आर्थरने स्वतःच एक टाइमटेबल तयार केलं आहे, जेणेकरून तो सर्व पत्नींना सारखा वेळ देऊ शकेल, त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवू शकेल. याच वेळापत्रकामुळे त्याचा वांदा झाला आहे. बऱ्यादा त्याला जिच्यासोबत राहायचं आहे तिच्यासोबत राहायला मिळत नाही. मन नसतानाही रोस्टरनुसार ठरलेल्या पत्नीसोबतच वेळ घालवावा लागतो. दुसरं नुकसान म्हणजे त्यांच्यावर होणारा खर्च. त्यांचं खर्च सांभाळणं सोपं नसल्याचं तो म्हणाला.

हे वाचा - खरं प्रेम संपत नसतं, या आजोबांनी पुन्हा खरं करून दाखवलं, VIDEO च्या प्रेमात पडाल

बहुपत्नी असण्याचे फायदेही त्याने सांगितले आहे. जास्त पार्टनर असण्याचा सर्वात अधिक फायदा म्हणजे शारिरिक संबंधाचं स्वातंत्र्य. वीकेंडला मी खूप मस्ती करतो. मी जास्त बायका केल्याचा विरोध करणारेच आता बहुविवाहची इच्छा ठेवत असतील, असंही तो म्हणाला.

First published:

Tags: Couple, Relationship, Viral, Wedding, Wedding couple