जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Desi Jugaad: हात न लावता शेण उचलण्याचा अजब जुगाड, शेतकऱ्याची ही ट्रिक झाली Viral

Desi Jugaad: हात न लावता शेण उचलण्याचा अजब जुगाड, शेतकऱ्याची ही ट्रिक झाली Viral

Desi Jugaad: हात न लावता शेण उचलण्याचा अजब जुगाड, शेतकऱ्याची ही ट्रिक झाली Viral

अनेक शेतकरी संशोधन वृत्ती जोपासून, शेतातली छोटी-मोठी कामं करण्यासाठी लहान-मोठी यंत्रं तयार करत आहेत. इंटरनेटच्या (Internet) वाढत्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या या यंत्रांची माहिती वेगानं पसरत असताना दिसते.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 17 डिसेंबर : शेतातलं (Farming) प्रत्येक काम ठरावीक वेळेत आणि मेहनतीनं पूर्ण करावं लागतं. गेल्या काही वर्षांत शेती क्षेत्राला मजूर टंचाईचा (Labor Shortage) सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेती क्षेत्रात यांत्रिकीकरण (Mechanization) वाढावं यासाठी सरकार, संशोधन संस्था आणि विद्यापीठं सर्वतोपरी प्रयत्नशील आहेत. याचा परिणामही दिसून येत आहे. अनेक शेतकरी संशोधन वृत्ती जोपासून, शेतातली छोटी-मोठी कामं करण्यासाठी लहान-मोठी यंत्रं तयार करत आहेत. इंटरनेटच्या (Internet) वाढत्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या या यंत्रांची माहिती वेगानं पसरत असताना दिसते. इंटरनेट दुनियेत याला `देसी जुगाड` (Desi Jugaad) असं संबोधलं जातं. हे जुगाड किंवा ट्रिक्स (Tricks) पाहून शेतकऱ्यांच्या कल्पकतेला नेटिझन्सकडून दाद मिळते. अन्य शेतकरीदेखील हे जुगाड वापरताना दिसतात. सध्या इंटरनेटवर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यात एक शेतकरी जनावरांचं शेण (Dung) हात न लावता साफ करताना दिसत आहे. याबाबतचं वृत्त `झी न्यूज हिंदी`ने दिलं आहे. मजूर टंचाईमुळे त्रस्त झालेले शेतकरी आता शेतीकामांसाठी काही ना काही ट्रिक्स शोधून काढू लागले आहेत. अशा ट्रिक्स वापरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सध्या इंटरनेटवर अशाच एका ट्रिकचा व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यात शेतकरी एका विशिष्ट तंत्राचा वापर करून शेणाला हात न लावता, स्वच्छता करताना दिसत आहे. शेतात, गोठ्यात किंवा घराच्या अंगणात जनावरं असतील तर परिसराच्या साफसफाईचं काम शेतकऱ्याला करावं लागतं. यात श्रम आणि वेळ मोठ्या प्रमाणात खर्च होतो. व्हिडिओत दर्शवलेल्या देशी जुगाडामुळे आता शेणाला हात न लावता परिसराची स्वच्छता वेगाने करणं शेतकऱ्यांना शक्य होणार आहे. जनावरांचं शेण उचलण्यासाठी आणि गोठा स्वच्छ करण्यासाठी या शेतकऱ्यानं तयार केलेलं उपकरण सध्या विशेष चर्चेत आहे. हात न लावता शेण उचलणं हे तसं अवघड काम आहे; मात्र या शेतकऱ्यानं तयार केलेल्या उपकरणाचा वापर करून हात न लावता शेण उचलणं सोपं झालं आहे. यामुळे गोठ्याचा परिसर कमी वेळात स्वच्छ करता येणार आहे. हा व्हिडिओ इंन्स्टाग्रामवरच्या (Instagram) `जुगाडू लाइफ हॅक` या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्याला शेण उचलण्याचं देशी जुगाडू उपकरण अशी कॅप्शन देण्यात आली आहे. या व्हिडिओतलं हे उपकरण नेटिझन्सच्या विशेष पसंतीस उतरताना दिसत आहे.

    जाहिरात

    यापूर्वीदेखील व्हिडिओतल्या शेतकऱ्यानं अनेक शेतीकामं सुलभ व्हावीत, याकरिता देशी जुगाड केलेली आहेत. त्या ट्रिक्सना नेटिझन्ससह शेतकऱ्यांनीही पसंती दर्शवली आहे. पिकांचं पक्ष्यांपासून संरक्षण होहण्यासाठी या शेतकऱ्यानं एक विशेष डिव्हाइस (Device) तयार केलं होतं. शेतकऱ्याचं हे अनोखं संशोधन पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात