नवी दिल्ली 07 मे : प्रेम हे प्रेम असतं. आजच्या काळात प्रेमाची व्याख्या खूप बदलली आहे. मुले मुलांशी प्रेम करतात. आजच्या काळात अशीही प्रकरणं पाहायला मिळतात, ज्यात मुलीला दुसऱ्या मुलीवरच प्रेम झालं. अशा स्थितीत कोणी सापाच्या प्रेमात पडलं तर कदाचित आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नसेल. सोशल मीडियावर एका व्यक्तीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्यक्ती सापासोबत रोमँटिक झालेला दिसला. हा रोमान्स फक्त मिठी मारण्यापुरता मर्यादित नव्हता. त्या व्यक्तीने सापाचं चुंबन घेतलं. पत्नीसोबत घटस्फोट झाल्याने आनंद साजरा करायला बंजी जंपिंगसाठी गेला, तिथेच दोरी तुटली अन्… होय, सोशल मीडियावर सापासोबत किस करतानाचा हा व्हिडिओ अनेकांनी पाहिला. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने लाल टोपी घातली आहे. त्याने आरामात साप आपल्या गळ्यात गुंडाळला. आधी त्याने सापावरुन हात फिरवला. यानंतर त्याने सापाचा चेहरा त्याच्याकडे वळवला आणि त्याला किस करू लागला. पण हे प्रेम एकतर्फी नव्हतं, असं दिसतं. सापानेही आपला फणा काढला आणि त्या व्यक्तीला किस केलं. जमशेदपूरमध्ये टॅलेंटची कमतरता नाही, असं व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. म्हणजेच हा व्हिडिओ जमशेदपूरमध्ये शूट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ रस्त्याच्या कडेला बनवला गेला आहे. व्हिडिओमधील व्यक्ती टी-शर्ट कॅपमध्ये दिसत आहे. त्याच्या गळ्यात साप गुंडाळला आहे. त्या व्यक्तीने सर्वप्रथम लोकांना त्याच्या गळ्यात गुंडाळलेल्या सापाशी ओळख करून दिली. यानंतर त्याच्या मानेला स्पर्श केला. बघता बघता त्याने सापाचा चेहरा आपल्या दिशेने वळवला आणि त्याला किस केलं. सापानेही विरोध केला नाही.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी अशा प्रकारचे स्टंट जीवघेणे ठरू शकतात, अशी प्रतिक्रिया दिली आहे. सापाने परत हल्ला केला असता तर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असता. हे प्रेम त्याच्यासाठी घातक ठरू शकतं, असं अनेकांनी म्हटलं. त्याच वेळी, एका व्यक्तीने कमेंटमध्ये लिहिलं, की हा साप त्याच्या एक्सपेक्षा चांगला आहे. एका व्यक्तीने लिहिलं की, आता सापही सिंगल नाही. या व्हिडिओवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं, तर अनेकांनी मजेदार इमोजीसह त्यावर प्रतिक्रिया दिल्या.

)







