मुंबई, 21 जानेवारी : साप म्हणताच अनेकांच्या अंगाला घाम फुटतो. पण काही लोक असे आहेत, जे सापाला बिलकुल घाबरत नाही. किंबहुना सापासोबत ते असं काही करताना दिसतात ते पाहूनच आपल्याला धडकी भरते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एक तरुण चक्क सापाला किस करायला गेला. त्यानंतर त्याच्यासोबत जे घडलं ते पाहून तुमच्या अंगावर अक्षरशः काटा येईल.
सापाला किस करणं तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. नको ती हिरोगिरी त्याच्या अंगाशी आली आहे. जसं त्याने सापाला किस केलं तसा साप त्याला अशा ठिकाणी चावला की तो पुरता हादरला. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका तरुणाने सापाला आपल्या हातात पकडलं आहे. इतक्यात एक तरुण उत्साहात त्या सापासमोर येतो. गुडघ्यावर बसतो आणि त्या सापाला किस करायला जातो. सापाच्या तोंडाजवळ आपलं तोंड नेत तो सापाला किस करतो. शेवटी साप तो साप. त्यानेही आपलं रूप दाखवलंच. जसं तरुणाने त्याला किस करण्याचा प्रयत्न केला तसा सापानेही दंश केला. त्याच्या तोंडावरच तो चावला.
हे वाचा - बापरे बाप! तरुणीचं चक्क अजगरासोबत डेटिंग; हॉटेलमध्ये गेले आणि... Shocking Video Viral
तेव्हा मात्र हिरोगिरी करत सापाला किस करायला गेलेला हा तरुण पुरता हादरला. सापाने हल्ला करताच तो खाली कोसळला. त्यानंतर घाबरून कसाबसा उठला आणि तिथून सापापासून दूर पळाला.
यावेळी तरुणाच्या हातातील सापही खाली पडला आणि तो पळण्याचा प्रयत्न करू लागला. व्हिडीओत पुढे तरुण त्या सापाची शेपटी पकडलेला दिसतो. शेपटी धरलेली असल्याने सापाला पळता येत नाही. थोड्या वेळाने तरुण शेपटी सोडतो, तसा सापही पुढे पळून जातो. तरुण त्याच्या मागेमागे जाताना दिसतो.
हे वाचा - माणसाला जिवंत गिळताना दिसला अवाढव्य अजगर; VIDEO पाहूनच अंगाचं पाणी पाणी होईल
हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. @reportersfact ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
सांप को किस करना पड़ा भारी...!#viral #VIDEOS #Trending pic.twitter.com/s7zQjM0BX8
— Reporters Fact (@reportersfact) January 19, 2023
तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Snake, Snake video, Viral, Viral videos