मुंबई, 21 सप्टेंबर : करावं तसं भरावं अशी म्हण आपल्याला माहिती आहे. ही म्हण तंतोतंत जुळेल असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यात एका तरुणाने असं काही केलं की त्याला लगेच त्याच्या कर्माची फळं मिळाली (Man kick tree). व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीसुद्धा असं काहीतरी चुकीचं किंवा वाईट करताना किती तरी वेळा विचार कराल (Tree fall on man’s head). कारण नसताना कुणाच्या वाट्याला जाऊ नये, कुणाला त्रास देऊ नये असं म्हणतात. पण तरी तसं केलं तर त्याच्या भयंकर परिणामांना आपल्यालाही सामोरं जावं लागतं. याचा प्रत्यक्ष अनुभव या तरुणाने घेतला. त्याला त्याच्या चुकीची अशी शिक्षा मिळाली जी तो कधीच विसरणार नाही.
व्हिडीओत पाहू शकता, एक तरुण झाड पाडण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याला आपल्या ताकदीवर इतका विश्वास आहे की लाथ मारूनच तो झाड पाडताना दिसतो आहे. हे वाचा - अरे बापरे! केस पेटत होते तरी ती काम करत राहिली आणि…; पाहा धक्कादायक VIDEO एका किकमध्ये झाड पाडलं खरं पण त्याच्या दुसऱ्याच क्षणी झाड तुटून त्याच्याच डोक्यावर पडलं. ज्या झाडाला त्याने लाथ मारली तेच झाड त्याच्या डोक्यावर पडून त्याला गंभीर दुखापत झाली. तरुण वेदनेने ओरडत जमिनीवरच पडला. झाडानेच या तरुणाला तिथल्या तिथं त्याच्या कर्माचं फळ दिलं. होल्ड माय बिअर ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर नेटिझन्सनी बऱ्याच कमेंट केल्या आहेत. देव तुमच्या प्रत्येक कर्मावर लक्ष ठेवतो, चांगलं करा किंवा वाईट प्रत्येक गोष्टीच फळ मिळतं, वनदेवतेने चांगला धडा शिकवला. अशी प्रतिक्रिया काही युझर्सनी दिली आहे. हे वाचा - किक मारून भिंत तोडली पण…, दुसऱ्याच क्षणी तरुणाची हिरोगिरी उतरली; पाहा VIDEO याआधीसुद्धा झाड कापणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. एक व्यक्ती पाम ट्री या उंच अशा झाडावर बसून त्याचा शेंडा कापत होती आणि त्यानंतर आकाशात हेलकावे खात बसली.
ते झाड खूपच उंच असल्यामुळे कापताना ते एका बाजूला वाकले होते. पण कापून पूर्ण झाल्यानंतर शेंडा एका बाजुला फेकला गेला आणि उर्वरित झाड वेगळे झाले. एका क्षणासाठी वाटतं की तो माणूस देखील त्यामुळे दुसरीकडे फेकला जाईल की काय. पण तो तसाच त्या झाडावर हेलकावे खात बसला आहे.

)







