नवी दिल्ली, 11 मे : वन्य प्राण्यांना जवळून पाहण्याचं लोकांना नेहमीच आकर्षण असतं. मात्र प्राणी जेवढे आकर्षित वाटतात तेवढेच ते खतरनाकही असतात. त्यांना त्रास दिल्यावर किंवा त्यांची शांतता भंग केल्यावर ते रागाच्या भरात काय करतील याचा काही नेम नाही. अशा प्राण्यांच्या हल्ल्यांच्या अनेक घटना आत्तापर्यंत समोर आल्या आहेत. अशातच यामध्ये आणखी एका घटनेची भर पडली असून एका रागावलेल्या हत्तीचा व्हिडीओ समोर आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये जंगल सफारीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या लोकांवर एक जंगली हत्ती रागाच्या भरात हल्ला करताना दिसत आहे. तो रागामध्ये पर्यटकांचा पाठलाग करताना दिसून आला. या व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
या व्हायरल व्हिडिओमध्ये हेल्मेट घातलेला एक व्यक्ती संतप्त हत्तीपासून स्वतःला वाचवण्यासाठी धावताना दिसत आहे. दुसरीकडे हत्ती आपल्या दिशेने येताना पाहून पर्यटक सतत आरडाओरडा आणि आवाज करत असल्याचं ऐकू येत आहे. त्यामुळे हत्ती आणखीनच संतापतो आणि पर्यटकांच्या दिशेने जोरात धावू लागतो. तेवढ्यात पर्यटक आपली गाडी घेऊन निघून जातात. यातील काही लोक या घटनेचा व्हिडीओ शूट करत असल्याचं दिसत आहे.
This is not "Fun" its "Fatal" pic.twitter.com/qtIOlrKvqb
— WildLense® Eco Foundation 🇮🇳 (@WildLense_India) May 9, 2023
@WildLense_India नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही वेळातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला पहायला मिळाला. व्हिडीओवर भरपूर कमेंटही येताना दिसत आहेत. दरम्यान, प्राण्यांच्या हल्ल्यांचे असे व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच गराळा घालताना दिसतात. यामध्ये अनेक भयंकर, विचित्र, अंगावर काटा आणणारे व्हिडीओ समोर येतात. दिवसेंदिवस प्राण्यांची दहशत वाढली असून तो मानवी वस्तीकडेही येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे.