Home /News /viral /

Shocking! रेकॉर्ड बनवण्यासाठी तोंडात पकडले 11 अतिविषारी साप; आता गिनीज बुकने दिला मोठा झटका

Shocking! रेकॉर्ड बनवण्यासाठी तोंडात पकडले 11 अतिविषारी साप; आता गिनीज बुकने दिला मोठा झटका

वर्ल्ड रेकॉर्ड (World Record) बनवण्यासाठी जॅकीने आपल्या तोंडात 11 अतिशय विषारी रॅटल स्नेक पकडले (Man Hold 11 Rattle Snakes In Mouth). हा कारनामा जॅकीने 2010 मध्ये केला होता.

    नवी दिल्ली 03 डिसेंबर : जगभरात अनेक असे लोक आहेत जे वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यासाठी काहीही करायला तयार असतात. अनेकदा तर यासाठी ते सगळ्या सीमा पार करतात. वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याची अशीच इच्छा अमेरिकेच्या टेक्सास येथील जॅकी बिब्बी (Jackie Bibby) याच्या मनातही निर्माण झाली. वर्ल्ड रेकॉर्ड (World Record) बनवण्यासाठी त्याने आपल्या तोंडात 11 अतिशय विषारी रॅटल स्नेक पकडले (Man Hold 11 Rattle Snakes In Mouth). हा कारनामा जॅकीने 2010 मध्ये केला होता. मात्र आता ही कॅटेगिरीच गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सने हटवली आहे. आपल्या फेसबुक पेजवरुन गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सने या रेकॉर्डचे होल्डर फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये जॅकीने आपल्या तोंडात अकरा साप पकडले होते. हा रेकॉर्ड अतिशय घातक होता. यातील एखाद्या सापानेही जॅकीला चावा केला असता तर त्याचा मृत्यू निश्चित होता. हा भयंकर स्टंट आता गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने आपल्या लिस्टमधून बाहेर केला आहे. जॅकीने 2010 मध्ये हा रेकॉर्ड बनवला होता. आता 11 वर्षानंतर हे लिस्टमधून बाहेर काढण्यात आलं आहे. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सने आपल्या फेसबुक पेजवर याबाबतची माहिती दिली. त्यांनी हे स्पष्ट केलं की आता इथून पुढे ते हे रेकॉर्ज मॉनिटर करणार नाहीत. हे यासाठी की इथून पुढे कोणीही रेकॉर्ड बनवण्यासाठी हा घातक स्टंट करू नये. रेटस स्नेक हे जगातील सर्वात घातक सापांमधील एक आहेत. याच्या विषाचे काही थेंबही जीवघेणे ठरतात. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड जगभरातील अशा लोकाच्या रेकॉर्डची नोंद ठेवतं, जे युनिक आहेत. जर कोणी असं काही काम करत असेल जे हटके आणि अतिशय वेगळं आहे किंवा इतरांना ते शक्य होत नाही, तर अशा व्यक्तींची यात नोंद केली जाते. अनेकदा हे रेकॉर्ड बनवताना लोकांचा जीवही जातो. प्रत्येक वर्षी हे रेकॉर्ड रिन्यू केले जातात.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Snake, World record

    पुढील बातम्या