पाटणा 10 मार्च : मन मोठं असेल तर पैसे असण्याने किंवा नसण्याने काही फरक पडत नाही, असं म्हणतात. याचाच प्रत्यय देत बक्सर जिल्ह्यातील हरिकिशुनपूर गावात राहणारे विजय खरवार यांनी गुरुवारी संध्याकाळी झोपडपट्टीतील गरीब मुलांना एका रेस्टॉरंटमध्ये नेलं आणि त्यांना जेवण खाऊ घातलं. रेस्टॉरंटमध्ये आवडीचे पदार्थ खाऊन मुलंही आनंदी आणि समाधानी दिसत होती. मुलांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं होतं. अजबच! नातवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आजोबा बनवतायत अडीच कोटींचा बेट या संदर्भात माहिती देताना विजय खरवार म्हणाले की, ते मोठे भांडवलदार नसून मोबाईल रिचार्जचं दुकान चालवतात. त्यांनी सांगितलं की, 20 व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त देवाला प्रसन्न करण्यासाठी पार्क व्ह्यू फॅमिली रेस्टॉरंटमध्ये गावातील 45 दुर्लक्षित मुलांना जेवण देण्यात आलं. विजय खरवार यांनी सांगितलं की, ही त्या कुटुंबातील मुलं आहेत, ज्यांच्या पालकांना रेस्टॉरंटमध्ये जेवण मिळू शकलं नाही. त्यांनी सांगितलं की सर्व मुलं आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील आहेत आणि सर्व सरकारी शाळेत शिकतात. या मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी त्यांनी त्यांच्या लग्नाच्या 20 व्या वाढदिवसानिमित्त रेस्टॉरंटमध्ये जेवण ठेवलं. यावेळी मुलांना शाही पनीर, मिक्स व्हेज, बटर रोटी, पुलाव, डाळ, पापड, कोशिंबीर, रसगुल्ला, मँगो फ्रूटी आदी पदार्थ खायला घालण्यात आले. विजय यांनी म्हटलं, की हे छोटे छोटे आनंद गरीब मुलांसोबत साजरे केल्यास त्याचं सुख दुप्पट होऊन जातं.
विजय खरवार यांनी ही कल्पना त्यांना त्यांचे मित्र प्रभात मिश्रा यांनी दिल्याचे सांगितले. त्यानंतर झोपडपट्टी भागातील गरीब मुलांना रेस्टॉरंटमध्ये आणून लग्नाच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला. नंतर एकत्र जेवण केले. विजय यांने सांगितले की, समाजात परिवर्तन आणि जागृती आणण्यासाठी तुम्ही मोठे उद्योगपतीच असावं असं नाही. त्यापेक्षा प्रबळ इच्छाशक्ती आणि औदार्याची भावना असली पाहिजे, तर समाजात नक्कीच बदल घडून येईल.