मुंबई 24 सप्टेंबर : कधीकधी आयुष्यात काही अनपेक्षित गोष्टी घडतात, ज्याचा आपण कधी विचारही केला नसतो. तुमच्यासोबतही असंच घडलं असेल की तुमच्याकडून काहीतरी अचानक हरवलं आणि खूप शोधूनही ते तुम्हाला सापडलं नाही. एका व्यक्तीच्या बाबतीत असचं घडलं. त्याच्याकडे असणारी एक रिंग 5 वर्षांपूर्वी हरवली होती, खूप शोधल्यानंतरसुद्धा ती सापडली नाही. मात्र, 5 वर्षानंतर ती अशा ठिकाणी सापडली, ज्याची त्याने कल्पनाही केली नव्हती. जॉय लाइकिन्स असं या व्यक्तीचं नाव आहे. 35 वर्षांच्या जॉय यांच्या छातीत तीव्र वेदना होत होत्या, आणि त्याला खोकलाही येत होता. जेव्हा त्यांनी स्कॅनिंग केलं, तेव्हा त्यांच्या फुफ्फुसात एक रिंग अडकली असल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आलं. याबाबत जॉय यांना कळालं, तेव्हा त्यांचा सुरुवातीला विश्वासच बसला नाही. कारण त्यांच्या फुफ्फुसात अडकलेली रिंग ही तीच होती, जी त्यांच्याकडून 5 वर्षांपूर्वी हरवली होती. विशेष म्हणजे, ही रिंग तब्बल 5 वर्षं त्यांच्या फुफ्फुसात अडकली होती, पण त्यांना ते कळलंही नाही. VIDEO : तोल जाऊन तो ट्रेनखाली पडला, बापाला काही सुचलं नाही म्हणून असा प्रकार केला; पण… पियर्सिंग करण्याचा छंद पडला महागात? अमेरिकेतील सिनसिनाटी येथे राहणारे जॉय लाइकिन्स यांना पियर्सिंग (शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर छिद्र पाडून घेण्याचा) करण्याचा छंद आहे. त्यांनी नाकाला छिद्र पाडून रिंग घातली होती. ही रिंग 5 वर्षांपूर्वी हरवली. काही आठवड्यांपूर्वी त्यांना मध्यरात्री खोकल्याचा त्रास झाला. काहीतरी श्वास रोखून धरत आहे, असं त्यांना वाटलं. वेदना असह्य झाल्या, व श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने जॉय यांना न्यूमोनिया झाला असल्याचं वाटू लागलं. पण दुसऱ्याच दिवशी डॉक्टरांनी त्यांना एक्स-रे काढण्यास सांगितलं. त्यामध्ये जॉय यांच्या डाव्या फुफ्फुसात एक रिंग अडकलेली दिसली. यावेळी डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. जॉय यांना याबाबत त्यांनी माहिती दिली. फुफ्फुसात अडकलेली रिंग पाहताना जॉय यांना आठवलं की, ही तिच रिंग आहे जी 5 वर्षांपूर्वी हरवली होती. 11 दिवस काम सोडून मजा करण्याचा पगार; प्रसिद्ध भारतीय कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली स्पेशल रजा अशी गेली फुफ्फुसात रिंग जॉय यांनी सांगितलं की, ‘पाच वर्षांपूर्वी जेव्हा मी सकाळी उठलो, तेव्हा माझ्या नाकात असणारी रिंग गायब होती. मी ही रिंग जवळपास 4 वर्षे नाकात घातली होती. रिंग हरवल्यानंतर मी तिचा सर्वत्र शोध घेतला, पण ती सापडली नाही. मला वाटलं की, ही रिंग मी चुकून गिळली आहे.’ प्रत्यक्षात मात्र जॉयने श्वास घेतल्यानंतर ही रिंग त्यांच्या डाव्या फुफ्फुसात जाऊन अडकली होती. हे त्यांना आता पाच वर्षांनंतर कळालं. आता डॉक्टरांनी सर्जरी करुन ही रिंग बाहेर काढली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.