मराठी बातम्या /बातम्या /Viral /बायकोच्या मृत्यूनंतर घर साफ करताना नवऱ्याला सापडले 3 मुलांचे मृतदेह; कपाटात बॅगेत होते बंद

बायकोच्या मृत्यूनंतर घर साफ करताना नवऱ्याला सापडले 3 मुलांचे मृतदेह; कपाटात बॅगेत होते बंद

काळजाचा थरकाप उडवणारी अशी ही घटना आहे. बायकोचा कर्करोगामुळे मृत्यू झाला, त्यानंतर दोन दिवसात घर साफ करताना नवऱ्याला कपाटात मुलांचे मृतदेह आढळले.

काळजाचा थरकाप उडवणारी अशी ही घटना आहे. बायकोचा कर्करोगामुळे मृत्यू झाला, त्यानंतर दोन दिवसात घर साफ करताना नवऱ्याला कपाटात मुलांचे मृतदेह आढळले.

काळजाचा थरकाप उडवणारी अशी ही घटना आहे. बायकोचा कर्करोगामुळे मृत्यू झाला, त्यानंतर दोन दिवसात घर साफ करताना नवऱ्याला कपाटात मुलांचे मृतदेह आढळले.

  पॅरिस, 27 ऑगस्ट : अनेकदा आपल्या आसपास घडणारे गुन्हे (Crime in france)  अनेक प्रश्न उपस्थित करणारे असतात. काही गुन्ह्यांचा तपास गुंतागुंतीमुळे दीर्घ काळ चालतो. काही गुन्हे अत्यंत भीतिदायक आणि काळजाचा थरकाप उडवणारे असतात. फ्रान्समधल्या (France) ली मेन्स (Le Mans) या शहरात अशीच काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. येथील एका व्यक्तीच्या घरात तीन मुलांचे मृतदेह (Dead Bodies Of 3 Children found in france home) आढळले आहेत. विशेष म्हणजे या व्यक्तीच्या पत्नीचं नुकतंच निधन झालं असून, या दाम्पत्याला मूलबाळ नव्हतं. त्यामुळे या मृत मुलांचा या दाम्पत्याशी काय संबंध आहे, याचं कोडं सर्वांनाच पडलं असून, ते सोडवण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.

  या मुलांचं नेमकं वय किती, याचाही अद्याप खुलासा झालेला नाही. या घटनेची माहिती समोर आल्यापासून तिथले नागरिक भयभीत झाले आहेत. एकाच घरात तीन मृतदेह सापडणं आणि तेदेखील लहान मुलांचे, ही खरोखरच गंभीर बाब असून, याविषयी सोशल मीडियावर (Social Media) नागरिक मोठ्या प्रमाणावर चर्चा करताना दिसून येत आहेत.

  पत्नीच्या इच्छेविरोधात ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार नाही - उच्च न्यायालय

  फ्रान्समधल्या ली मेन्स इथल्या मीझीरेमधल्या (Mezeray) 41 वर्षांच्या एका व्यक्तीच्या पत्नीचं कर्करोगामुळे (Cancer) निधन झालं. पत्नीच्या निधनानंतर पती जेव्हा घराची साफसफाई करत होता, तेव्हा या व्यक्तीला जे आढळून आलं ते पाहून तो चकितच झाला. त्याला घराची साफसफाई करताना एका मुलाचा मृतदेह आढळून आला. मृतदेह पाहून ही व्यक्ती घाबरली आणि त्याने तातडीने पोलिसांना (Police) फोन केला. पोलिसांनी घरी येताच घराची आणखी तपासणी केली असता, त्यांना अजून दोन मृतदेह आढळून आले. हे दोन्ही मृतदेह एका बॅगेत ठेवण्यात आले होते आणि मृतदेहांजवळ एक चाकूदेखील होता. या मुलांच्या वयाबाबत अद्याप पोलिसांनी कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

  पत्नीच्या इच्छेविरोधात ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार नाही - उच्च न्यायालय

  डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, या व्यक्तीच्या पत्नीचा 1 ऑगस्टला कर्करोगाने मृत्यू झाला होता. या व्यक्तीचं घर सार्थे जंगलानजीक आहे. या व्यक्तीला पहिला मृतदेह घराच्या गॅरेजमधल्या बंद कपाटात आढळून आला. उर्वरित दोन मृतदेह (Dead body) घराजवळच्या एका छोट्या खोलीतल्या कपाटात आढळून आले. या दाम्पत्याला मूलबाळ नव्हतं. परंतु, त्याच्या पत्नीचा हा दुसरा विवाह होता. पहिल्या पतीपासून तिला दोन मुलं झाली होती. हे मृतदेह नेमके कोणाचे असावेत, याबाबत सध्या पोलिस सखोल तपास करत आहेत.

  First published:

  Tags: Crime, France