जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / 'पत्नीच्या इच्छेविरोधात ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार नाही'; 'त्या' प्रकरणी उच्च न्यायालयाचा निर्णय

'पत्नीच्या इच्छेविरोधात ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार नाही'; 'त्या' प्रकरणी उच्च न्यायालयाचा निर्णय

'पत्नीच्या इच्छेविरोधात ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार नाही'; 'त्या' प्रकरणी उच्च न्यायालयाचा निर्णय

कोर्टात असं सांगण्यात आलं, की कायदेशीररित्या पत्नी असलेल्या महिलेसोबत तिच्या पतीनं ठेवलेले शारीरिक संबंध किंवा कोणतंही लैंगिक कृत्य हे बलात्कार नाही, ते पत्नीच्या इच्छेविरोधात किंवा जबरदस्तीनं असलं तरीही

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 27 ऑगस्ट : कायदेशीररित्या पत्नीच्या इच्छेविरोधात तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणं म्हणजे बलात्कार नसल्याचं छत्तीसगड उच्च न्यायालयानं (Chhattisgarh High Court) म्हटलं आहे. कोर्टानं राज्यातील बेमेतरा जिल्ह्यातील एका प्रकरणावर सुनावणी करताना हा निर्णय दिला आहे. या घटनेत महिलेनं आपल्या पतीवर बलात्कार (Rape on Wife) आणि अनैसर्गिक पद्धतीनं संबंध ठेवल्याचा आरोप केला होता. पतीनं याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. वकील वाय सी शर्मा यांनी सांगितलं, की जस्टिस एन के चंद्रवंशी यांच्या बँचनं कायदेशीररित्या विवाहित पत्नीसोबत तिच्या इच्छेविरोधात किंवा बळजबरीनं संबंध ठेवणं म्हणजे बलात्कार नसल्याचं म्हटलं आहे. शर्मा यांनी सांगितलं, की या महिलेत आणि तिच्या पतीमध्ये काही कारणांवरून वाद सुरू होता. पत्नीनं ठाण्यात तक्रार दाखल केली होती, की त्यांचं जून 2017 मध्ये लग्न झालं आहे. लग्नानंतर काही दिवसातच तिच्या पतीनं आणि सासरकडच्या लोकांनी हुंड्याची मागणी करत तिचा छळ करण्यास सुरुवात केली. काळी जादू करत असल्याच्या संशयावरून शेजाऱ्याचा खून, बहीण आजारी पडल्याने केले वार विवाहितेनं आरोप केला, की पती तिला शिवीगाळ करत मारहाणही करत असे. अनेकदा पतीनं तिच्या इच्छेविरोधात आणि अनैसर्गिकरित्या शारीरिक संबंधही ठेवले. वकीलांनी सांगितलं, की चौकशीनंतर महिलेचा पती आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक न्यायालयानं तक्रारीनंतर या व्यक्तींना आरोपीही ठरवलं होतं. LOVE, लग्न आणि पलायन! लग्नाच्या 55 व्या दिवशी पळाली नववधू शर्मा यांनी सांगितलं, की महिलेच्या पतीनं बलात्कार प्रकरणी स्थानिक न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. कोर्टात असं सांगण्यात आलं, की कायदेशीररित्या पत्नी असलेल्या महिलेसोबत तिच्या पतीनं ठेवलेले शारीरिक संबंध किंवा कोणतंही लैंगिक कृत्य हे बलात्कार नाही, ते पत्नीच्या इच्छेविरोधात किंवा जबरदस्तीनं असलं तरीही. याप्रकरणात गुजरात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील काही प्रकरणांची उदाहरणंही दिली गेली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात