तूप म्हणजे भारतीय जेवणातील अविभाज्य भाग. तूप आरोग्यासाठीही चांगलं म्हणून डाळ, भाजीत टाकलं जात. शिवाय चपाती, पराठ्यांनाही भरभरून तूप लावलं जातं. पण अमेरिकेत तुपावर बंदी आहे. त्यांच्या मते, ब्लड प्रेशर आणि लठ्ठपणाचा धोका आहे.
समोसा म्हणजे कित्येक भारतीयांचा जीव की प्राण. पण सोमालियात अल शबाब गटामुळे यावर बंदी आहे याचं कारण म्हणजे याचा त्रिकोणी आकार आहे.
भारतात बरेच लोक इम्युनिटी बुस्टर म्हणून च्यवनप्राश खातात. पण कॅनडात 2005 सालापासून यावर बंदी आहे. कारण यात लीड आणि मरक्युरी जास्त प्रमाणात असतं.
कबाबची किंमत मांसाहारींनाच माहिती. मिडल ईस्टमधून भारतात आलेली हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. पण 2017 साली वेनिन्समध्ये यावर बंदी घालण्यात आली. शहराची परंपरा आणि कायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
भारतात मसाले, काही पदार्थ आणि सरबतमध्ये खसखस वापरलं जातं. पण सिंगापूर, तैवान, सौदी अरेबिया, यूएईसारख्या देशात यावर बंदी आहे. कारण यात मॉर्फीन घटक असतो. (सर्व फोटो सौजन्य - Canva)