लखनऊ 05 जुलै : प्रेमात माणूस काहीही करतो, असं आपण अनेकदा ऐकलं असेल आणि हे वाक्य बऱ्याचदा खरं होतानाही पाहिलं असेल. अनेकदा माणूस एखाद्याच्या प्रेमात इतका इतका वेडा होतो की परिणामांचा विचार न करता त्या प्रेमासाठी काहीही करायला तयार होतो. अशीच एक घटना आता प्रयागराजमधून समोर आली आहे. यात एका तरुणाने प्रेमात आपल्या पुरुष प्रियकरासाठी चक्क आपलं लिंगच बदललं. इतकंच नाही तर दोघांनी मंदिरात लग्नही केलं आणि शारिरीक संबंधही ठेवले. मात्र आता प्रियकराने सोबत राहण्यास नकार दिला. हे प्रकरण प्रयागराजला लागून असलेल्या कौशांबी जिल्ह्यातील आहे. या परिसरात राहणारा राहुल हा नाटकात नर्तक म्हणून काम करतो. 2016 मध्ये शेजारील गावातील तरुणाने त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. लग्नाचं वचन देत अनेकवेळा त्याच्यासोबत शारीरिक संबंधही ठेवले. राहुल प्रियकरासाठी लिंग बदलून रागिणी बनला. लिंग बदलल्यानंतर लग्न झालं आणि आता प्रियकर त्याला पत्नी म्हणून ठेवण्यास नकार देत आहे. पोलीसही याप्रकरणात गुन्हा नोंद करून घेण्यास टाळाटाळ करत आहेत. ‘हम दिल दे चुके सनम…’ हा तर निघाला खरा अजय देवगण! बायकोचं लावलं प्रियकराशी लग्न इन्स्पेक्टर महेश चंद म्हणाले, की हे प्रकरण खूप गुंतागुंतीचं आहे. रागिणी बनलेल्या तरुणाने त्याची फसवणूक झाल्याचं म्हटलं आहे, मात्र कोणत्या रुग्णालयातून शस्त्रक्रिया केली, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास झाल्यानंतर त्याच कलमात गुन्हा नोंदवून कारवाई केली जाईल. मोतीलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या डॉ मोहित जैन यांनी सांगितलं की, लिंग बदलासाठी दीड वर्षाहून अधिक कालावधी लागतो. यासाठी न्यूरोलॉजिस्ट, सायकॉलॉजिस्ट, प्लास्टिक सर्जन आणि गायनॅकॉलॉजिस्ट यांचं पॅनेल रुग्णाचं समुपदेशन करतात. आठ ते दहा सत्रांनंतर मनोचिकित्सक या प्रक्रियेस मान्यता देतात. हार्मोन्स बदलण्याची प्रक्रिया सहा महिने चालते, त्यानंतर शस्त्रक्रिया केली जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.