यादरम्यान राम निवास गिरी पिकअप गाडीवर चढले आणि नर्तकांसोबत नाचू डान्स करू लागले. यादरम्यान ते गाडीच्या छताला असलेल्या लोखंडी रॉडला लटकून स्टंट करू लागले. त्यानंतर अचानक त्यांचा हात सुटला आणि ते जमिनीवर कोसळले. यानंतर एकच गोंधळ उडाला. रिक्षातील महिलेच्या मांडीवरुन रस्त्यावर पडला चिमुकला; मागून वेगात आली बस अन्..., थरारक घटनेचा Live Video जखमी राम निवास यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यानंतर कुटुंबीयांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. मृत राम निवास हे अविवाहित होते आणि आपल्या लहान भावाच्या कुटुंबासह गावात राहात होते. या प्रकरणी भटनीचे एसएचओ संतोष कुमार सिंह यांनी सांगितलं की, नाचताना पडल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, मात्र कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले आहेत. सध्या या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून यात ही संपूर्ण घटना पाहायला मिळते.उत्तर प्रदेश: वरातीत डान्स करत होता वृद्ध, स्टंट करताना खाली कोसळून मृत्यू pic.twitter.com/ppBBmnyZbb
— News18Lokmat (@News18lokmat) June 14, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dance video, Shocking video viral