Home /News /viral /

मित्राची मजा अन् नवरदेवाला सजा, वरातीत चांगलाच बँड वाजला; नेमकं काय केलं पाहा VIDEO

मित्राची मजा अन् नवरदेवाला सजा, वरातीत चांगलाच बँड वाजला; नेमकं काय केलं पाहा VIDEO

मित्र घोड्यावर चढला आणि नवरदेवासोबत काय घडलं पाहा.

  मुंबई,  07 ऑक्टोबर : लग्न (Wedding video) म्हटलं की मजामस्ती आलीच. नवरा-नवरीला जितक्या आपल्या लग्नाचा आनंद असतो, तितकाच आनंद त्यांच्या जवळच्या लोकांनाही असतो (Wedding funny video) . यात त्यांचं कुटुंब, नातेवाईक, पाहुणे आणि मित्र परिवारही आलाच (Baarat video). आपल्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या लग्नात सर्वजण धम्माल करताना दिसतात. पण अनेकदा अशी मजामस्ती चांगलीच महागात पडते (Groom fall from horse video). सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. लग्नात मित्राची मजामस्ती त्याच्यासह नवरदेवालाही महागात पडली आहे. नवरदेवाची मस्त घोड्यावर बसून वरात काढली जाते आहे. नवरदेव आपल्या नवरीला आणायला जातो आहे. वाजतगाजत वरात चालली आहे. इतक्या घोड्यावर नवरदेवाचा मित्र चढतो. तो नवरदेवाच्या मागे घोड्यावर उभा राहतो. घोड्यावर उभा राहून तो मस्तपैकी पैशांच्या नोटा उधळतो आणि इतक्यात त्याचा तोल ढासळतो.
  View this post on Instagram

  A post shared by [] (@horse_of_kathiyawad1)

  नवरदेवाच्या मित्राचा घोड्यावरून पाय घसरतो आणि तो धाडकन कोसळतो. बरं तो पडतो ते पडतो पण एकटा नाही तर चक्क नवरदेवाला घेऊनच. जसा हा तरुण घोड्यावरून पडतो तेव्हा तो स्वतःला वाचवण्यासाठी म्हणून नवरदेवाला पकडतो. पण नवरदेवसुद्धा त्याच्यासोबत धाडकन खाली कोसळतो. व्हिडीओ पाहून जितका धक्का बसतो तितकंच हसूही येतं. हे वाचा - मेहुण्याच्या गर्लफ्रेंडसोबत केली विचित्र मस्करी; लग्नातच नवरदेवामुळे लागलं भांडण horse_of_kathiyawad1 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. लोकांनी हा व्हिडीओ पाहून मजा घ्यायला सुरुवात केली आहे. यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Funny video, Viral, Viral videos, Wedding video

  पुढील बातम्या