जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 'ही' महिला थडग्यापाशी जाऊन मिळवते रेसिपीज आणि बनवते मृतांच्या आवडीचे पदार्थ

'ही' महिला थडग्यापाशी जाऊन मिळवते रेसिपीज आणि बनवते मृतांच्या आवडीचे पदार्थ

मृतांच्या आवडीचे पदार्थ बनवणारी महिला

मृतांच्या आवडीचे पदार्थ बनवणारी महिला

स्मशानभूमीत मुद्दामहून कुणीच फिरायला जात नाही; पण ही अमेरिकन महिला मात्र त्याला अपवाद आहे. ही महिला मृतांच्या थडग्यापाशी जाऊन त्यांच्या थडग्यावरच्या माहितीआधारे पक्वान्नांची रेसिपी मिळवते.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    जगात वेगवेगळ्या मानसिकतेच्या व्यक्ती असतात. प्रत्येकाची आवड-निवडही वेगवेगळी असते. काही जणांना सिनेमाची किंवा बसची तिकिटं जमवण्याचा छंद असतो, तर कुणाला पोस्टाचे स्टॅम्प जमवायला आवडतं. आवडीप्रमाणे प्रत्येक जण आपले छंद जोपासतो. परंतु, काही जणांचे छंद अगदीच निराळे असतात. असाच एक निराळा छंद जोपासलाय अमेरिकेत राहणार्‍या एका महिलेने. ही महिला थडग्याजवळच्या दगडावर लिहिलेली माहिती वाचते आणि त्यांची नोंद करून ठेवते. स्मशानभूमीत मुद्दामहून कुणीच फिरायला जात नाही; पण ही अमेरिकन महिला मात्र त्याला अपवाद आहे. ही महिला मृतांच्या थडग्यापाशी जाऊन त्यांच्या थडग्यावरच्या माहितीआधारे पक्वान्नांची रेसिपी मिळवते. घरी जाऊन तो पदार्थ ती तयार करते. परंतु, असं करण्यामागे एक कारण आहे. ती म्हणते, की अशाप्रकारे ती मृत व्यक्तींच्या आठवणींना उजाळा देते, त्यांचं आयुष्य सेलिब्रेट करते. वर्षभरापासून आवडीने करतेय ती हे काम रोझी ग्रॅंट असं या महिलेचं नाव आहे. ती लायब्ररी सायन्सची विद्यार्थिनी आहे. वर्षभरापासून ती हा छंद जोपासतेय. कॉंग्रेशनल सिमेट्रीच्या अर्काइव्ह्ज पाहायला ती गेली होती. तिथे तिला पहिली रेसिपी मिळाली. ही रेसिपी स्प्रिट्ज कुकीजची होती. त्यात फक्त 7 घटकांचा समावेश केला गेला होता. त्यानुसार रेसिपी बनवल्यावर तिने आणखी रेसिपीजचा शोध घेतला. रोझीचं असं म्हणणं आहे, की ‘या निरनिराळ्या रेसिपीज तिला मृत्यूकडे वेगळ्या दृष्टिकोनाने बघायला शिकवतात.’ ग्रेव्हस्टोनवर लिहिलेल्या माहितीच्या आधारे बनवलेल्या रेसिपीचा टिकटॉक व्हिडिओ तिने केला. हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला. त्यामुळे तिला हे काम करण्यासाठी खूप उत्साह मिळाला. प्रोत्साहनही मिळालं. लिझ वॅलेट या फेसबुक अकाऊंटवरून याची माहिती आणि फोटो शेअर करण्यात आले आहेत. हेही वाचा -  सकाळी टीन, संध्याकाळी बाटली; बिअरप्रेमी माकडामुळे शॉप मालक हैराण, Video पाहाच! कबरीपाशी (थडग्यापाशी) जाऊन मिळवते रेसिपीज रोझी ही कबरीपाशी जाऊन पक्वान्नांच्या रेसिपीज शोधते. ही गोष्ट नक्कीच अजब आहे. तिला एका थडग्यावर चॉकलेट फजची रेसिपी मिळाली होती. तो पदार्थ फारच रुचकर होता. त्या थडग्यावर असंही लिहिलं होतं की, ‘हे थडगं ज्या महिलेचं आहे, त्या महिलेला ती जिवंत असताना हा पदार्थ लोकांना खाऊ घालायला आवडत असे’. आतापर्यंत रोझीने अशा प्रकारच्या 12-13 रेसिपीज बनवल्या आहेत. या सगळ्या रेसिपीज तिला थडग्यापाशीच मिळाल्या. तिच्या या छंदामुळे सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्समध्ये वाढ झाल्याचं कळतंय. त्यातल्या काहींना हे पदार्थ फारच आवडलेत. रोझीचा हा छंद हा मृतात्म्यास श्रद्धांजलीसमानच असल्याचं वॉशिंग्टन पोस्टमध्ये म्हटलं गेलंय.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात