भुवनेश्वर 10 मे : पोलिसांचं काम समाजात न्याय आणि शासनव्यवस्था राबविणं आहे. पण ज्याच्या खांद्यावर ही विशेष जबाबदारी आहे, त्याची कोणी फसवणूक केल्याचं समोर आलं तर? होय, अशीच एक घटना घडली आहे जिथे एका आयपीएस अधिकाऱ्यासोबत फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. खुद्द आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांनी ही माहिती दिली. याविषयी ट्विट करत त्यांनी डोसा खाण्यासाठी गेलेल्या अरुणची यांची फसवणूक कशी केली गेली आणि त्यांच्या नावावर जास्तीचं बिल कसं चिकटवण्यात आलं, हे सांगितलं. खरंतर अरुणने एका रेस्टॉरंटमध्ये डोसा ऑर्डर केला. त्याचं बिल मागितल्यावर त्यांना धक्काच बसला. एक डोसा मागवल्यावर त्याला त्यांना डोस्यांचं बिल आलं. त्यांनी वेटरला याबाबत विचारलं असता समोरच्या टेबलावरील व्यक्तीने पोलिसाचा मित्र असल्याचं भासवत डोसा मागवला आणि बिल न भरताच पळून गेल्याचं समोर आलं. अबब! तब्बल 1.6 लाख रुपयांचा पिझ्झा; काय आहेत यात इतकं खास पाहा VIDEO संपूर्ण घटनेचं वर्णन करताना अरुण यांने ट्विट केलं की, “मी एकटाच रेस्टॉरंटमध्ये डोसा खाण्यासाठी गेलो होतो. मी बिल पाहिलं तेव्हा मला आश्चर्य वाटलं, त्यात दोन डोसांची किंमत लिहिलेली होती. वेटरला विचारल्यावर त्याने सांगितलं की टेबलच्या दुसऱ्या बाजूला बसलेल्या व्यक्तीने मसाला डोसा खाल्ला, त्याने तुमच्यासोबत आला असल्याचं सांगितलं. यानंतर बिल येण्यापूर्वीच तो माणूस निघून गेला.” अरुणच्या ट्विटला 3500 हून अधिक लोकांनी लाईक केलं आहे, तर 161 लोकांनी रिट्विट केलं आहे. पोलिसासोबत झालेल्या फसवणुकीबद्दल अनेकांनी खंतही व्यक्त केली. त्या व्यक्तीला पुन्हा कसं पकडायचं, याबद्दल कोणीतरी त्यांना सल्ला दिला. अशाच एका व्यक्तीने गंमतीने कमेंट केली, “पुढच्या वेळी आम्हाला पण कॉल करा…” दुसर्या युजरने म्हटलं की फुकटात डोसा खाणारी व्यक्ती सीसीटीव्ही फुटेज तपासून पकडली जाऊ शकते. आणखी एकाने लिहिलं, “मला आश्चर्य वाटतं, जर त्या व्यक्तीला माहित होतं की तुम्ही पोलीस आहात?”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.