जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मित्राच्या लग्नात इतका नाचला की मंडपातच तरुणाचा झाला धक्कादायक शेवट; पाहा Live Video

मित्राच्या लग्नात इतका नाचला की मंडपातच तरुणाचा झाला धक्कादायक शेवट; पाहा Live Video

डान्स करताना मृत्यू.

डान्स करताना मृत्यू.

मित्राच्या लग्नात डान्स करणाऱ्या तरुणाचा मंडपातच जीव गेला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई, 22 नोव्हेंबर :  मृत्यू कधी कुठे कसा कुणाला गाठेल सांगू शकत नाही. जीममध्ये एक्सरसाइझ करताना आणि एखाद्या कार्यक्रमात डान्स करताना मृत्यूची झाल्याची बरीच प्रकरणं हल्ली समोर आली आहेत. असाच आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत नाचता नाचता एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मित्राच्या लग्ना त डान्स करणाऱ्या तरुणाचा मंडपातच जीव गेला आहे. डान्स करताना अचानक या तरुणाला मृत्यूने गाठलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता स्टेजवर काही तरुण उभे आहेत. एक तरुण ज्याने जिन्स पँट आणि टी-शर्ट जॅकेट घातलं आहे, तो तरुण इतका आनंदात आहे की अगदी जोशात नाचताना दिसतो आहे. तो एकटाच खूप डान्स करतो आहे. मध्येच थांबतो, मध्येच नाचतो असंच त्याचं सुरू असतं. पण त्यानंतर जे घडतं ते धक्कादायक आहे. असं काही होईल याचा कुणी विचारही केला नसेल.

जाहिरात

नाचता नाचता हा तरुण धाडकन स्टेजवर कोसळतो. तेव्हा तिथं उपस्थित सर्व लोकही घाबरतात. हे वाचा -  नाचता नाचता महिलेचा गेला तोल, पुढं घडलं असं काही जे पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. vishnurawal_media इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात