जाहिरात
मराठी बातम्या / Viral / नाचतानाचता महिलेचा गेला तोल, पुढं घडलं असं काही जे पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

नाचतानाचता महिलेचा गेला तोल, पुढं घडलं असं काही जे पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

नाचतानाचता महिलेचा गेला तोल, पुढं घडलं असं काही जे पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका फंक्शनमध्ये काही महिला गाण्यावर नाचताना दिसत आहेत.

  • -MIN READ Trending Desk New Delhi,Delhi
  • Last Updated :

    सोशल मीडियावर तुम्ही रोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहता. यातील काही व्हिडिओ असे असतात की, जे तुम्हाला विचार करायला भाग पाडतात, तर काही व्हिडिओ असेही असतात जे पाहून तुम्हाला हसू आवरता येत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये डान्स करण्यात मग्न असलेली एक महिला तोल जाऊन एका लहान मुलाच्या अंगावर पडते. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला असून त्यावर मज्जेदार कमेंटसुद्धा येत आहेत. लग्न सोहळ्यात तुम्ही अनेकदा डीजेच्या तालावर नाचला असाल. डीजे सुरू होताच लग्न सोहळ्यात आलेल्या लहान मुलांसह, महिला, ज्येष्ठ नागरिक यापैकी अनेकजण डान्स करतात. हा डान्स करीत असताना अनेक मजेदार किस्सेही घडत असतात. त्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता असाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला डान्स फ्लोअरवर बिनधास्त डान्स करताना दिसत आहे. तेव्हाच तेथे एक लहान मूलही डान्स करण्यासाठी येते. पण त्यानंतर त्या मुलासोबत असं काही घडतं, जे पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. नाचतानाचता गेला तोल, आणि व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका फंक्शनमध्ये काही महिला गाण्यावर नाचताना दिसत आहेत. यात एका महिलेसमोर एक जाड महिला नाचत असून या दोघींच्या मध्ये जाऊन नाचण्याचा प्रयत्न एक लहान मुलगा करीत असल्याचे दिसत आहे. सर्वात प्रथम जेव्हा हा मुलगा त्या दोघींच्या मध्ये नाचण्यासाठी जातो, तेव्हा एका महिलेचा त्याला धक्का लागल्यानं तो बाजुला होतो. पण नंतर तो पुन्हा या दोन महिलांच्या मध्ये नाचण्यासाठी येतो. त्याचवेळी नाचत असणाऱ्या जाड महिलेचा पाय अडकतो, व ती थेट मुलाच्या अंगावर पडते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर लोकांनी मजेदार कमेंट केल्या आहेत.

    जाहिरात

    हजारो लोकांनी पाहिला व्हिडिओ सोशल मीडियावर हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील planet_visit नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 2 दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला असून तो आतापर्यंत 60 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 1349 लोकांनी त्याला लाईक केलं आहे. अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरनं कमेंट दिली आहे की, गेम ओव्हर. तर अनेक यूजर्सची मुलाची स्थिती जाणून घ्यायची इच्छा होती, असे त्यांच्या कमेंटवरून दिसत आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात