नवी दिल्ली 24 फेब्रुवारी : एका व्यक्तीला आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच अतिशय मोठं गिफ्ट मिळालं. हा व्यक्ती गेल्या 50 वर्षांपासून लॉटरीच्या तिकीटासाठी आपलं नशीब आजमावत होता. तो रोज एका नव्या आशेनं दिवसाची सुरुवात करायचा आणि संध्याकाळपर्यंत त्याच्या खात्यात 50 वर्षांपासून त्याला काहीच बदल दिसत नव्हता. तो एक विक्षिप्त व्यक्ती असल्याचं त्याच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. तुम्हीही या व्यक्तीला वेडा म्हणाल. पण, 50 वर्षांनी त्याच्या वाढदिवशी नशिबाने त्याला साथ दिली आणि तो करोडपती झाला. ही कथा आहे कॅनडातील एका वृद्धाची. गेल्या अर्धशतकापासून तो लॉटरी खेळत आहे. ड्रेसडेन असं या व्यक्तीचं नाव आहे. तो ओंटेरियो, कॅनडाचा रहिवासी आहे. 1980 पासून तो रोज हा लॉटरीचा खेळ खेळत आहे. पण कधीही जिंकला नाही. मात्र एके दिवशी त्याचं नशीब बदलणार होतं. या दिवशी तो खरेदीसाठी घराबाहेर पडला. तो एका मिनी मार्टमधून 5 कॅनेडियन डॉलर्समध्ये लॉटरीचे तिकीट खरेदी करतो. इतर दिवसांप्रमाणे तो ते खिशात ठेवतो. घरी पोहोचल्यावरच तो प्रत्येक तिकीट स्क्रॅच करायचा. पण, यावेळी नशिबाला काही वेगळंच मंजूर होतं. दुसऱ्या दिवशी त्याचा वाढदिवस होता. तेव्हा निसर्गाने त्याला भेटवस्तू देण्याचं ठरवले होतं. घरी पोहोचल्यानंतर त्यानी तिकीट स्क्रॅच केलं, तेव्हा त्यावर 32 क्रमांक लिहिलेला होता. श्वानांच्या लग्नाचा शाही थाट! लग्नात नाचायला बार डान्सर्स, 3 दिवस सुट्टी, 50 हजार लोकांना 3 वेळा जेवण mirror.co.uk या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार ड्रेसडेनला समजलं होतं की यावेळी मोठं काहीतरी हाती लागणार आहे. त्याने तिकीट आणखी स्क्रॅच केलं आणि मग त्यावर जे लिहिलं होतं, ते पाहून त्याला आश्चर्य वाटलं. जेव्हा त्याने तो नंबर इन्स्टंट बिंगो लॉटरीच्या सर्वोच्च बक्षीसाशी जुळवला तेव्हा त्याला आढळलं की त्याने एक लाख डॉलर्स जिंकले आहेत. ही रक्कम सुमारे 80 लाख रुपये होती. या विजयाने तो इतका चकित झाला होता की तो आपल्या बिछान्यावरून उठूही शकत नव्हता. या विजयाच्या रात्री त्याला नीट झोपही आली नाही. दुसऱ्या दिवशी त्याचा वाढदिवस होता. त्याने दुकानात जाऊन तिकीट तपासलं आणि मग त्याला आपल्या जिंकण्याची खात्री पटली. ड्रेसडन म्हणतो की, वाढदिवसाला मिळालेली ही सर्वोत्तम भेट आहे. या पैशातून तो त्याच्या घराची दुरुस्ती करून घेईल. स्वतःसाठी एक आयफोन खरेदी करेल आणि आपल्या मुलीच्या लग्नासाठी काही पैसे वाचवेल. या विजयामुळे त्याचा आनंद गगनात मावत नसल्याचं त्याने सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.