व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती ऑमलेट बनवत असते. त्या व्यक्तीच्या आसपास बरेच लोक आहेत. सुरुवातीला ही व्यक्ती एक अंडं फोडते आणि तव्यावर टाकते. त्या अंड्यातून अंड्याचा बलकच बाहेर पडतो. त्यानंतर ही व्यक्ती दुसरं अंडं घेते आणि तेसुद्धा तव्यावर फोडते. तेव्हा त्या अंड्यातून बलक नाही तर चक्क कोंबडीचं एक पिल्लू बाहेर पडतं (Chick Viral Video). हे वाचा - हा नेमका कुत्रा आहे की कोंबडा? मजेशीर VIDEO पाहून तुम्हीही बुचकळ्यात पडाल तवा गरम असल्याने अंड्यातून तव्यावर पडताच कोंबडीचं पिल्लू पळू लागतं. अंडी फोडणाऱ्या व्यक्तीचंही लक्ष जातं आणि तो त्या कोंबडीच्या पिल्लाला पटकन तव्यावरून उचलून आपल्या हातात घेतो. robinhood_preet नावाचाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे याची माहिती नाही. पण सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. हे वाचा - बदकाची शिकार करण्यासाठी आले 4 वाघ; पुढे जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही, VIDEO हा व्हिडीओ पाहून काही नेटिझन्स हैराण झाले आहेत. तर काही युझर्सनी हा व्हिडीओ एडिट केल्याचं म्हटलं आहे. या व्हिडीओत किती तथ्य आहे माहिती नाही. त्यामुळे न्यूज 18 लोकमतही या व्हिडीओची पुष्टी करत नाही.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chicken, Shocking viral video, Viral, Viral videos