व्हिडीओत दिसतं आहे की, मंडपाच्या दारी एक सजवलेली गाडी उभी आहे. साहजिकच ही गाडी नवरा-नवरीची आहे. त्या गाडीच्या समोरच्या दिशे वर-वधू येतात. पण ते चालत नाही तर नाचत येतात. त्यांच्यामागोमाग काही नातेवाईकही डान्स करताना दिसत आहे. हे वाचा - VIDEO - याला कुणीतरी आवरा! नवरा-नवरीच्या मध्येच उभं राहून तरुण हे करतोय तरी काय? जशा गरब्याच्या स्टेप असतात तसे हे लोक एका रांगेत नाचत पुढे येताना दिसत आहेत. पण हा डान्स करताना तसा कुणाच्याही चेहऱ्यावर फार उत्साह, आनंद दिसत नाही आहे. जसं काही त्यांना कुणी जबरदस्तीच नाचायला लावलं आहे. couple official page इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. प्रत्येक समाजातील लग्नाच्या वेगवेगळ्या विधी-परंपरा असतात. पण मुलीची पाठवणी अशी करण्याचीही ही वेगळी पद्धत कोणती? हे नक्की चाललंय तरी आहे? याला काय म्हणायचं? हे काय आहे काहीच समजत नाही? अशा बऱ्याच प्रतिक्रिया हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्सकडून येत आहेत. हे वाचा - 3 मुलींच्या बिदाईच्या वेळी मुख्यमंत्री झाले भावुक; एकाच मांडवात लागली लग्न बरं तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं आहे? हे नक्की काय सुरू आहे हे तुम्ही सांगू शकता का? तर नक्की आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Funny video, Viral, Viral videos, Wedding video