जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO - रक्षकासमोर भक्षक नमला! देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकासमोर किंग कोब्रानेही पत्करली हार

VIDEO - रक्षकासमोर भक्षक नमला! देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकासमोर किंग कोब्रानेही पत्करली हार

जवानासमोर सापाने मानली हार

जवानासमोर सापाने मानली हार

किंग कोब्राचा कधीच पाहिला नसेल असा हा व्हिडीओ आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई, 28 मे : किंग कोब्रा, जगातील सर्वात खतरनाक सापां पैकी एक. त्याच्या कुणी वाकड्यात शिरलं तर त्याला तो सोडत नाही. फणा काढून समोर उभा राहतो आणि समोरच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. पण हाच भक्षक रक्षकासमोर नमला आहे. कुणालाही न जुमानणारा कोब्रा देशाचं रक्षण करणारा जवान समोर येताच त्याच्यासमोर शरण गेला. त्याने स्वतःच हार मानली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. किंग कोब्राचा कधीच पाहिला नसेल असा हा व्हिडीओ आहे. कित्येकांवर भारी पडणाऱ्या किंग कोब्राने एका जवानासमोर शरणागती पत्करली आहे. व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क व्हाल. असं दृश्य तुम्हाला कधीच पाहायला मिळणार नाही. म्हणून हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सैनिकाच्या गणवेशात एक व्यक्ती आहे. त्यामुळे हा जवानच असावा. त्याच्यासमोर फणा काढून उभा राहिलेला एक भलामोठा कोब्रा साप आहे. जवान आणि साप आमनेसामने आहेत. जवान सापाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो आहे. हातापायांची हालचाल करत तो सापाला आपल्या कंट्रोलमध्ये आणतो. सापही शांतपणे जवानाकडे पाहत उभा राहिला आहे. खोडकर माकडाने खतरनाक कोब्राशी घेतला पंगा; शेपटी धरून खेचत नेलं, शेवटी…; Watch Video फणा काढून राहिलेला किंग कोब्रा आणि समोर जवान हे दृश्य पाहताच क्षणी जवान समोर येताच सापाने जणू त्याला सॅल्युट केलं असंच वाटतं आहे. थोड्या वेळाने जवान हळूहळू त्या सापाजवळ जातो. त्याच्या डोक्यावर हात ठेवून हळूहळू त्याचं डोकं खाली करतो. साप जवानसमोर नतमस्तक होतं. जणू त्याने जवानासमोर शरणागती पत्करली, हार मानली असंच हे दृश्य पाहिल्यानंतर आपल्या मनात येतं. जवान त्या कोब्राचं तोंड आपल्या हातात धरतो. तसा साप त्याच्या हाताभोवती वेटोळे काढतं. कसंबसं नुसत्या हातांनी कोणतंही प्रोटेक्शन न वापरता जवान किंग कोब्राला धरतो. बापरे! हा VIDEO पाहिल्यानंतर टॉयलेटमध्ये जायलाच घाबरत आहेत लोक; असं काय आहे यात तुम्हीच पाहा हा व्हिडीओ पाहिल्यावर आपल्यालाही धडकी भरते. रेडिटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

Thai Marine catching King Cobra by u/JQuest7575 in interestingasfuck

जाहिरात

तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात