जाहिरात
मराठी बातम्या / Viral / खोडकर माकडाने खतरनाक कोब्राशी घेतला पंगा; शेपटी धरून खेचत नेलं, शेवटी...; Watch Video

खोडकर माकडाने खतरनाक कोब्राशी घेतला पंगा; शेपटी धरून खेचत नेलं, शेवटी...; Watch Video

किंग कोब्रा आणि माकडाचा व्हिडीओ.

किंग कोब्रा आणि माकडाचा व्हिडीओ.

किंग कोब्रा आणि माकडाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई, 23 मे : माकड अतिशय खोडकर असतं. त्याच्यासमोर जो येईल त्याला तो त्रास देतो. पण एका माकडा ने चक्क खतरनाक किंग कोब्रा सापा शीच पंगा घेतला आहे. शेवटी जे घडलं ते धक्कादायक आहे. व्हिडीओ पाहूनच तुम्हाला धडकी भरेल. किंग कोब्रा आणि माकडाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. किंग कोब्रा जगातील सर्वात खतरनाक आणि विषारी सापांपैकी एक. ज्याचा दंश होताच काही तासांतच जीव जातो. अशा किंग कोब्राच्या वाकड्यात माकड शिरलं. माकडाने किंग कोब्राला त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्याने किंग कोब्राशी शेपटी खेचली. वारंवार तो शेपटी खेचत राहिला. शेवटी तो किंग कोब्राच त्यानेही माकडाला आपलं रूद्र रूप दाखवलं. Shocking Video! भुकेल्या व्यक्तीने कचाकचा चावला जिवंत साप; पुढे जे घडलं ते थरकाप उडवणारं व्हिडीओत पाहू शकता किंग कोब्रा फणा काढून बसलेला दिसतो आहे. त्याच्या समोर एक माकड आहे. माकड सापाच्या जवळ येतं आणि त्याची शेपटी खेचतं. साप सुरुवातीला पाहतच राहतो. त्यामुळे माकडाची हिंमत आणखी वाढते. तो पुन्हा सापाची शेपटी खेचतो आणि त्याला फरफटत नेतो. तेव्हा मात्र किंग कोब्रा चवताळतो. तो माकडावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. किंग कोब्राचं रूप पाहताच माकड घाबरतं आणि तिथून पळून जातं. इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. VIDEO - मांजरासाठी माकडाचीही विहिरीत उडी, वाचवण्यासाठी धडपड केली पण…; डोळ्यात पाणी आणणारा शेवट @shnoyakam इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

जाहिरात

तुम्हाला हा व्हिडीओ पाहताना काय वाटलं, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात