DJ डान्स करताना आजोबांवर बरसला आजीचा दांडा आणि... VIDEO पाहाल तर आवरणार नाही हसू

DJ डान्स करताना आजोबांवर बरसला आजीचा दांडा आणि... VIDEO पाहाल तर आवरणार नाही हसू

वय वाढतं पण बायकोचा दरारा, तिचा धाक आणि तिची भीती मात्र कायम राहते.

  • Share this:

मुंबई, 25 जानेवारी : घराबाहेर कुणी कितीही मोठा बॉस असला तरी घरात एकच बॉस ती म्हणजे बायको (Wife). बडे बडे लोकही हे मान्य करतात. बायकोसमोर तशी कुणाचीच चालत नाही. भल्याभल्याची बोलती बायकोसमोर बंद होतं. मग ते नवीन लग्न झालेलं तरुण जोडपं असो किंवा लग्नाला बरीच वर्षे झालेलं वयस्कर जोडपं असो. सर्वांची परिस्थिती सारखीच असाच एक व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) होतो आहे.

एका वृद्ध दाम्पत्याचा  (Husband-Wife) व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनं  (Virender Sehwag) हा व्हिडीओ शेअर केला आहे. जो पाहाल तर तुम्हालाही हसू आवरणार नाही. पोट दुखेपर्यंत हसाल.

व्हिडीओत पाहू शकता आजोबा डीजेवर मस्त डान्स करण्यात दंग आहेत. सफेद कुर्ता आणि लुंगी घालून, हातात टॉवेल भिरकावत आजोबा बिनधास्त डान्स करत असतात. डीजेवरील गाण्यांवर त्यांनी तरुणांसोबत चांगला ठेका धरला आहे. इतक्यात मागून हळूहळू चालत त्यांची बायको येते. बायको जवळ येताच नाचता नाचता आजोबांचं लक्ष पटकन तिच्याकडे जातं. तेव्हा आजी काठी आपटते आणि मग काय बायकोला समोर पाहताच आजोबांनी घाम फुटतो. बायको काठी घेऊन आल्याचं पाहताच आजोबा डिजे सोडून तिथून धूम ठोकतात. डीजे आणि बायकोपासूनही ते दूर पळून जातात.

हे वाचा - 

हा व्हिडीओ शेअर करताना सेहवागनं वय तात्पुरतं आहे, बायकोची काठी कायमचीच आहे, असं कॅप्शन दिलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर बऱ्याच मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी तर या व्हिडीओवरून सेहवागची थट्टा केली आहे.

Published by: Priya Lad
First published: January 25, 2021, 5:22 PM IST

ताज्या बातम्या