जाहिरात
मराठी बातम्या / Viral / नाईट क्लबमध्ये भेटलेल्या तरुणीला घरी आणणं भोवलं; तरुणाला 5 कोटींचा चुना, काय घडलं?

नाईट क्लबमध्ये भेटलेल्या तरुणीला घरी आणणं भोवलं; तरुणाला 5 कोटींचा चुना, काय घडलं?

नाईट क्लब (प्रतिकात्मक फोटो)

नाईट क्लब (प्रतिकात्मक फोटो)

एक प्रकार नुकताच समोर आला, जेव्हा एक व्यक्ती नाईट क्लबमध्ये गेला आणि तेथील एका मुलीशी बोलला. यानंतर त्याने तिला घरी बोलावलं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 20 मे : अनेक वेळा लोक पार्टी किंवा इतर ठिकाणी जातात तेव्हा ते अनोळखी लोकांकडे आकर्षित होतात. अशावेळी असंही घडतं की लोक विचार न करता काही मोठी पाऊलं उचलतात. कधी कधी ती अतिशय घातकही ठरतात. असाच एक प्रकार नुकताच समोर आला, जेव्हा एक व्यक्ती नाईट क्लबमध्ये गेला आणि तेथील एका मुलीशी बोलला. यानंतर त्याने तिला घरी बोलावलं. ती मुलगी घरी आली, पण त्या व्यक्तीचं इतके नुकसान करून निघून गेली की तो आयुष्यभर विसरू शकणार नाही. फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार, ही घटना फ्लोरिडाच्या मियामीमधील आहे. मियामी पोलीस एका महिलेचा शोध घेत आहेत जिने एका पुरुषाला नशेचा पदार्थ दिला आणि त्यानंतर त्याच्या तिजोरीवर डल्ला मारला. तिने मौल्यवान वस्तू पळवून नेल्या. यामध्ये दागिने, रोख रक्कम आणि महागड्या घड्याळांचा समावेश आहे. या सर्वासह ती सुमारे पाच कोटी रुपये घेऊन गायब झाली आहे. त्या व्यक्तीच्या घरी गेल्यावर तिने हे सर्व केलं. हनिमूनच्या नावाखाली सासूकडून 5 लाख घेतले अन् पत्नीला हातही लावला नाही, आता आला अडचणीत पोलीस अहवालात असं म्हटलं आहे, की ही घटना सकाळी घडली, जेव्हा ती त्या व्यक्तीच्या अपार्टमेंटमधून परत जात होती. हा व्यक्ती या तरुणीला नाईट क्लबमध्ये भेटला होता आणि त्याने तिला तिथून घरी बोलावलं. असं सांगितलं जात आहे, की ती रात्रीच त्या व्यक्तीच्या घरी पोहोचली होती. परंतु जेव्हा ती पहाटे निघून गेली तेव्हा ती एकटीच दिसली. यानंतर तरुण जेव्हा झोपेतून उठला तेव्हा त्याची तिजोरी उघडी होती. दरम्यान, महिलेनं आपलं सर्व काम उरकलं होतं. पोलिसांनी सांगितलं की, महिलेनं त्याला मादक पदार्थ पाजले आणि बेशुद्ध केलं. अधिकाऱ्यांनी असंही सांगितलं की, त्या व्यक्तीने बाहेर जाण्यापूर्वी महिलेसोबत अपार्टमेंटमध्ये मद्यपान केलं होतं. आपल्या मौल्यवान वस्तू गायब असल्याचं लक्षात येताच त्याने पोलिसांना बोलावलं. त्याचवेळी, फुटेजमध्ये असं दिसून येत आहे की, आधी ती व्यक्ती या तरुणीसोबत येताना दिसली होती, पण मुलगी परत जात असताना ती एकटीच होती. इमारतीच्या लिफ्टमध्ये बसवलेल्या कॅमेऱ्यात ती कैद झाली आहे. फुटेजमध्ये महिलेने पांढरा टॉप, काळा मिनीस्कर्ट आणि जीन्स जॅकेटखाली शूज घातले आहेत. तिच्या हातात गुलाबी केस असलेला आयफोन आहे. लिफ्टमधून बाहेर पडताना तिने निळा सोलो कप धरलेला देखील दिसत आहे, जो आत प्रवेश करताना तिच्या हातात नव्हता. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात