जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Shocking Video..! स्वतःचे कापलेले पाय हातात घेऊन रस्त्यावर फिरत होता व्यक्ती, बघताच लोकं लागले किंचाळू

Shocking Video..! स्वतःचे कापलेले पाय हातात घेऊन रस्त्यावर फिरत होता व्यक्ती, बघताच लोकं लागले किंचाळू

Shocking Video..! स्वतःचे कापलेले पाय हातात घेऊन रस्त्यावर फिरत होता व्यक्ती, बघताच लोकं लागले किंचाळू

आज आम्‍ही तुम्‍हाला असा एक व्हिडिओ दाखवणार आहोत, जो पाहिल्‍यानंतर तुमचाही थरकाप उडेल. मात्र, व्हिडीओचे सत्य समोर आल्यावर तुमचे मन गलबलून जाईल.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी: आज आम्‍ही तुम्‍हाला असा एक व्हिडिओ दाखवणार आहोत, जो पाहिल्‍यानंतर तुमचाही थरकाप उडेल. मात्र, व्हिडीओचे सत्य समोर आल्यावर तुमचे मन गलबलून जाईल. हा व्हिडीओ (Video) ज्याने पाहिला त्याची आरडाओरड झाली. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कापलेले दोन्ही पाय घेऊन रस्त्यावर फिरताना दिसत आहे. या व्यक्तीला पाहून लोकांची अवस्था दयनीय होत व्हिडिओत दिसतेय. एक व्यक्ती पाय हातात घेऊन चालताना दिसला ती व्यक्ती प्रथम व्हिडिओमध्ये दिसते. तुम्ही बघू शकता की, तो व्यक्ती पार्किंग एरियामध्ये पाय हातात धरून चालताना दिसत आहे. त्या व्यक्तीला असे पाहून तेथे उपस्थित असलेल्या महिलेची धांदल उडते. ती महिला इतकी घाबरते की काहीही विचार न करता तिथून पळून जाते. यानंतर ती व्यक्ती लिफ्टमध्ये दिसते. लिफ्टचा दरवाजा उघडताच ते पाहून दोन्ही मुलींचाही गोंधळ उडतो. यानंतर दोघीही तेथून पळून जातात. मग तो व्यक्ती एका आई आणि मुलाला घाबरवण्याचा प्रयत्न करतो. त्या व्यक्तीला पाहून मुलगा इतका घाबरतो की तिथून पळून जातो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही दोन मिनिटांसाठी भीती वाटली असेल. पण व्हिडिओची सत्यता असली तरी हा एक प्रँक व्हिडिओ आहे. जे पाहिल्यानंतर कोणाच्याही जीवावर बेतू शकते. हा प्रँक व्हिडिओ इंस्टाग्रामवर beautifulearth नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यासोबत युजरने कॅप्शन लिहिलं, ‘पहा लोकांच्या प्रतिक्रिया. पहा व्हिडिओ

जाहिरात

व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स संतापले हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर 3 दिवसांपूर्वी अपलोड करण्यात आला होता, मात्र या व्हिडिओमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत दीड लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर काही यूजर्स संतापले सुद्धा आहेत. या प्रकाराविरोधात लोक तक्रार करत असल्याची चर्चा आहे. एका युजरनं म्हटलं की, मुलांसोबत असा प्रँक अजिबात योग्य नाही. हे मुलांना वाईटरित्या घाबरवू शकते. या प्रँक व्हिडिओवर बंदी घातली पाहिजे, असं लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे एखाद्याचा जीवही जाऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात