मुंबई, 05 मार्च: सध्याच्या काळात लोक प्राधान्यानं सुपर मार्केटमध्ये शॉपिंग करतात. स्थानिक बाजारपेठेच्या तुलनेत या मार्केटमधल्या वस्तू दर्जेदार असतात, असं मानलं जातं. याशिवाय तेथील स्टोरेज सुविधा अन्य ठिकाणांपेक्षा चांगली असते. त्यामुळे लोक शॉपिंगसाठी सुपर मार्केटला पसंती देतात. जेव्हा लोक सुपर मार्केटमधून वस्तू खरेदी करतात तेव्हा त्याची गुणवत्ता चांगलीच असणार असा विश्वास त्यांना असतो. पण कधीकधी हिच गोष्ट त्यांना जड जाते. सुपर मार्केटमधून केळी (Banana) विकत घेतल्यावर, केळांसह घरात मृत्यूने कसा प्रवेश केला, याचा अनुभव एका व्यक्तीनं सोशल मीडियावरुन (Social Media) शेअर केला आहे.
सोशल मीडिया साइट टिकटॉकवर (Tik Tok) एका व्यक्तीनं या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्यक्तीनं घरी आल्यावर केळीची पेटी उघडली तेव्हा त्याला धक्का बसला. या पेटीत एक जीवघेणा विंचू (Scorpion) होता. जेव्हा या व्यक्तीचं लक्ष विंचवाकडं गेलं तेव्हा त्याला अक्षरशः घाम फुटला. केळीच्या बॉक्समध्ये असं काही असेल याबाबत त्यानं कधी विचारही केला नव्हता. सुपर मार्केटमधून आणल्यानं त्यानं केळीचा बॉक्स नीट तपासला नव्हता. पण थोडासा निष्काळजीपणादेखील त्याच्या जीवावर बेतला असता. टिकटॉकवर @bugboy19 या अकाउंटवरून या व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ शेअर केला.
हे वाचा-VIDEO-चिमुकल्या हातात धरली बंदूक आणि...; नेटकरी म्हणाले, 'मृत्यूशी खेळतोय मुलगा'
बॉक्स उघडताच बाहेर पडला विंचू
किचनमध्ये ठेवलेल्या या केळीच्या बॉक्समध्ये एक विचित्र प्राणी होता. या व्यक्तीनं बॉक्सचा काही भाग उघडताच समोर प्राणी पाहून त्याला धक्का बसला. आतून एक विंचू बाहेरच्या दिशेने पळाला. हा विंचू केळीच्या वरच्या देठांमध्ये लपून बसला होता. त्याचे सहा पाय आणि शक्तिशाली नांगी कोणालाही घाबरवण्यासाठी पुरेशी होती. हा विंचू प्लॅस्टिकमध्ये पॅकिंग केलेल्या केळीच्या घडात लपून बसला होता आणि या व्यक्तीनं तपासणी न करता सुपर मार्केटमधून तसाच तो घरी आणला.
हे वाचा-OMG! 3 मिनिटांत या तरुणाने बकाबका खाल्ले 88 केक; केला अजब विश्वविक्रम
घरात ठेवला विंचू
जेव्हा या व्यक्तीनं घरी खाण्यासाठी आणलेल्या केळीचा बॉक्स उघडला तेव्हा त्याची नजर विंचवावर पडली. या व्यक्तीनं त्याचा व्हिडीओ बनवला आणि शेअर केला. अनेक लोक या विंचवाला व्हिप स्कॉर्पियो (Whip Scorpio) म्हणून पाळतात. त्यामुळे या व्यक्तीनंदेखील हा विंचू घरातच ठेवला आहे. 'माझ्या या नव्या पाळीव प्राण्याला केळी फार आवडतात. त्यामुळे त्याच्यासाठी मी केळी घेऊन येतो,' असं या व्यक्तीनं सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.