नवी दिल्ली 07 डिसेंबर : जेव्हा मित्र भेटतात तेव्हा अनेकदा एकमेकांची चेष्टा, मस्करी करतात. अनेक जण मित्रांना चेष्टेच्या नावाखाली त्रासही देतात. बऱ्याचदा तर ही चेष्टा, मस्करी किंवा मित्रांवर जोक करताना मर्यादाही ओलांडली जाते. अलीकडेच एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्येही असंच पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये तरुणानं एका तरुणीला फोटो काढण्याच्या बहाण्याने हातानं उचललं; पण त्याने फोटो काढण्याऐवजी तिला चक्क तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिलं. तरुणाचं हे कृत्य पाहिल्यानंतर आजूबाजूला असणाऱ्यांना धक्काच बसला.
अरे देवा! इच्छापूर्तीसाठी हत्तीच्या पायाखालून गेला आणि तरुणाचं काय झालं पाहा VIDEO
@BornAKang या ट्विटर अकाउंटवरून अनेकदा विचित्र प्रँक व्हिडिओ पोस्ट केले जातात. अलीकडेच या अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तो खूपच धक्कादायक आहे. हा व्हिडिओ वेगानं व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तरुण तरुणीला प्रँकच्या नावाखाली तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकून देत असल्याचं दिसतंय.
व्हिडिओमध्ये नेमकं काय?
हा व्हिडिओ फ्रेंच भाषेत आहे. तरुणीला असं वाटलं, की तिचे फोटो काढण्यासाठी तरुण तिला उचलून घेत आहे. त्यामुळे तिने तशी पोझही दिली. प्रत्यक्षात तरुणानं तरुणीला दोन्ही हातांनी उचललं आणि थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिलं. हा व्हिडिओ रात्रीच्या वेळ चित्रित केला असून, त्यामध्ये आजूबाजूला बर्फ पडताना दिसतोय. या बर्फवृष्टीमुळे जमिनीवरही बर्फाचा ढीग साचला आहे. त्यामुळे तरुणाने जेव्हा तरुणीला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं तेव्हा ती थेट बर्फावर पडली आणि तिचा जीव वाचला. व्हिडिओच्या पुढच्या भागात ही तरुणी संबंधित तरुणावर रागावलेली दिसली; पण नंतर ती हसत निघून गेली.
मगरीच्या पोटात अडकला तरुण, मग मित्रांनी उचललं धक्कादायक पाऊल, Video Viral
व्हिडिओला मिळाले लाखो व्ह्यूज
या व्हिडिओला 25 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. एका युझरने कमेंट केली आहे, की, ‘त्या तरुणीचा जीव गेला का?’ आणखी एका युझरने कमेंट केली आहे, की, ‘त्या ठिकाणी त्या तरुणीचा बाप असता, तर बर्फ वितळल्यानंतर त्यानं त्या तरुणाला तिथून खाली फेकलं असतं.’ एका युझरने कमेंट करताना तरुणाला मूर्ख म्हटलं आहे. तो कमेंटमध्ये म्हणतो, ‘हा तरुण एवढा मूर्ख आहे, की एखाद्या महिलेला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं तर ती मरणार नाही याची खात्री आहे!’ आणखी एका व्यक्तीनं कमेंट करताना लिहिलं की, ‘आता लोक खुनाच्या प्रयत्नालाही प्रँकचं नाव देऊ लागले आहेत.’
दरम्यान, सध्या हा व्हिडिओ वेगानं व्हायरल होत असून, अनेक जण तो लाइक करतानाही दिसत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.