जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अरे याला आवरा! मेट्रोतच अंगावरील कपडे काढून...; व्यक्तीचं कृत्य पाहून प्रवाशी संतप्त; VIDEO VIRAL

अरे याला आवरा! मेट्रोतच अंगावरील कपडे काढून...; व्यक्तीचं कृत्य पाहून प्रवाशी संतप्त; VIDEO VIRAL

मेट्रोतच प्रवाशाचं नको ते कृत्य, प्रवाशी संतप्त.

मेट्रोतच प्रवाशाचं नको ते कृत्य, प्रवाशी संतप्त.

मेट्रोत सर्वांसमोरच प्रवाशाने असं काही केलं की पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 17 सप्टेंबर : मेट्रो म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्याचे काही नियमही असतात. आपल्याला हवं तसं, कुणाला त्रास होईल असं आपल्याला इथं वागता येत नाही. काही खासगी गोष्टी तर आपण इथं करूच शकत नाही. असं असताना एक व्यक्ती मात्र मेट्रोत सर्वांसमोरच बिनधास्तपणे असं काही करताना दिसली की सहप्रवाशीही शॉक झाले. व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. तसं सार्वजनिक ठिकाण म्हटलं की तिथं कधीतरी कोणत्या तरी कारणावरून कुणाचं ना कुणाचं भांडण होतंच. गाडीमध्ये सीटसाठी किंवा धक्का लागला म्हणून भांडणं होतात. मेट्रोतीलही अशाच भांडणाचा हा व्हिडीओ आहे. पण या भांडणाचं कारण मात्र वेगळं किंबहुना विचित्रच आहे. आता ते नेमकं काय ते तुम्हीच या व्हिडीओत पाहा. व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती मेट्रोच्या मधोमध आहे. जिच्या अंगावर शर्ट नाही. शर्ट काढून ही व्यक्ती एका प्लॅस्टिक टबमध्ये बसली आहे. तुम्हाला पाहूनच आश्चर्य वाटेल की ही व्यक्ती मेट्रोमध्ये चक्क अंघोळ करते आहे. सुरुवातीला ती स्पंजने आपलं शरीर घासते आणि त्यानंतर बाटलीतील पाणी डोक्यावरून अंगावर ओतताना दिसते. हे वाचा -  लपूनछपून नवऱ्यानेच रेकॉर्ड केला बायकोचा ‘तो’ VIDEO; सोशल मीडियावर पोस्ट करताच… ज्यावेळी ही व्यक्ती अंगावर पाणी ओतते तेव्हा तिच्या जवळ असलेल्या सीटवर बसलेल्या व्यक्तीवर हे पाणी उडतं. तेव्हा तो प्रवासी संतप्त होतो. या व्यक्तीचं कृत्य पाहून आधीच सर्व प्रवाशी हैराण झाले होते. सर्वजण या व्यक्तीकडे पाहत होते. ज्या व्यक्तीच्या अंगावर पाणी उडालं ती व्यक्ती रागातच होती. पण अंगावर पाणी उडताच तिचा राग आऊट ऑफ कंट्रोल होतो आणि आपल्या जागेवरून तो उठून अंघोळ करणाऱ्या व्यक्तीसोबत भांडू लागतो.

जाहिरात

दोघांमध्ये वाद होतो. त्यानंतर हाणामारीही होताना दिसते. पण इतर प्रवाशी संतप्त झालेल्या प्रवाशाला रोखतात. मेट्रोमध्ये नको ते कृत्य करणाऱ्या व्यक्तीपासून त्याला दूर नेतात आणि शांत करतात. त्यानंतर बाथ टबमधील व्यक्तीही रागात बाथटबमधून बाहेर पडते. हे वाचा -  Shocking! रोमान्स करताना चढला इतका जोश की तरुणीने पाडला त्याच्या कानाचा तुकडा; कचाकचा चावूनही खाल्ला @dailyinstavids ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ न्यूयॉर्कमधील असल्याचं सांगितलं जातं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात