क्वालालांपूर, 03 मार्च : घरगुती गॅस सिलेंडरचं वजन किती असतं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. हा सिलेंडर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवायचा म्हटला तरी धाम लागते आणि उचलायला गेलात तर घामच फुटतो. त्यासाठीही बरीच मेहनत घ्यावी लागते (Woman lift Gas Cylinder). पण एका महिलेने तर फार ताकद न लावता अगदी सहजरित्या एक नव्हे तर तब्बल 4 सिलेंडर एकाच वेळी उचलले आहेत (Woman Pushing Gas Cylinder).
मलेशियाच्या टेरेंगगनूमध्ये राहणारी 30 वर्षांची खैरूनीसा गेल्या तीन वर्षांपासून गॅस सिलेंडर सप्लायरचं काम करते. एकाच वेळी ती एकत्र दोन सिलेंडर जिन्यांवर चढवते आणि उतरवते. तर जमिनीवर ती सहजपणे एकाच वेळी चार सिलेंडर एकत्र खेचू शकते. सिलेंडर उचलतानाचा तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हे वाचा - Shocking! कारखान्यात काम करताना Private part मध्ये भरली हवा; तरुणाचं आतडंच फुटलं
याबाबत सांगताना खैरूसीना म्हणाली, खैरूसीनाने सांगितलं, पतीच्या निधनानंतर ती आपल्या सासूची काळजी घेते. त्यासाठी मिळेल ती काम ती करते. ट्रक चालवण्यापासून गॅस सिलेंडरही तिला डिलीव्हर करावा लागला. पूर्वी फक्त पुरुष करायचे अशी वजनदार कामं ती बऱ्याच कालावधीपासून करते आहे. लॉरी चालवण्यापासून ते ट्रक ड्रायव्हिंगपर्यंतच्या कामांचा समावेश आहे. नेहमी ती अशी कामं कुणाच्याही मदतीशिवाय करायची.
एकाच वेळी इतके सिलेंडर उचलायला ती गेल्यावर्षीच शिकली. त्यावेळी कंपनीकडे मनुष्यबळ कमी होतं. आता ती आपल्या या कामात एक्सपर्ट झाली आहे. एका दिवसात ती जवळपास 60 ते 100 गॅस सिलेंडर डिलिव्हर करते.
हे वाचा -पुरामुळे झाली ताटातूट! आईसाठी कासावीस झालेल्या लेकीने ओलांडला 'मृत्यूचा पूल'
सुरुवातीला सिलेंडर उचलणारी महिला म्हणून लोक तिच्याकडे आश्चर्याने पाहायचे. कारण सामान्यपणे हे काम पुरुषांचं आहे, असंच समजलं जातं. त्यामुळे महिलेला सिलेंडर उचलताना पाहून लोकांना विचित्र पाहायचं. पण आता लोकांनाही खैरूसीनाला सिलेंडर उचलताना पाहण्याची सवय झाली आहे. खैरूसीनाला अशी मेहनत करताना पाहून लोकांनीही तिचं कौतुक केलं आहे. काहींनी तिच्यासाठी मदतीचा हातही पुढे केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.