जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Shocking! कारखान्यात काम करताना Private part मध्ये भरली हवा; तरुणाचं आतडंच फुटलं

Shocking! कारखान्यात काम करताना Private part मध्ये भरली हवा; तरुणाचं आतडंच फुटलं

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

कम्प्रेसरने प्रायव्हेट पार्टमध्ये हवा भरल्यानंतर तरुणाच्या आतड्यांची लागली वाट.

  • -MIN READ
  • Last Updated :

भोपाळ, 03 मार्च : भांडणं विकोपाला गेल्यानंतर लोक कोणत्याही थरापर्यंत जातात किंवा बऱ्याच वेळा मस्करीची कुस्करी होते. असंच एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यात एका व्यक्तीच्या सहकाऱ्याने त्याच्या गुप्तांगात हवा भरली. यामुळे या व्यक्तीचं आतडं फुटलं. त्याचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना सर्जरी करावी लागली. मध्य प्रदेशच्या उज्जैनमधली ही धक्कादायक घटना आहे. आगर रोडमधील ग्राम बांदकामध्ये कुरकुरे बनवण्याचा एक कारखाना आहे. इथं उज्जैनमधील कमल सिंह राजपूत आणि पान बिहारमधील भर चौहान काम करतात. 16 फेब्रुवारीला ते दोघं एकत्र काम करत होते. त्यावेळी भरतने कमलच्या गुप्तांगात कम्प्रेसरने हवा भरली. त्यावेळी कमलला काही झालं नाही पण काही वेळाने त्याची प्रकृती बिघडली. हे वाचा -  पुरामुळे झाली ताटातूट! आईसाठी कासावीस झालेल्या लेकीने ओलांडला ‘मृत्यूचा पूल’ त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली तेव्हा धक्काच बसला. त्याचं आतडं फुटलं होतं. त्यानंतर त्याच्यावर सर्जरी करण्यात आली. सर्जरी करून त्याचा जीव वाचवण्यात आला. याबाबत कारखाना प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार कुरकुरे जास्त कालावधीपर्यंत पाकिटात सुरक्षित राहावेत यासाठी त्यामध्ये गॅस भरलं जातं. यासाठी कम्प्रेसरचा वापर होतो. दोन्ही कर्मचारी तीन दिवस कारखान्यात आले नाही, त्यावेळी या घटनेबाबत माहिती मिळाली. प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. पण त्यामध्ये 10 दिवसांची रेकॉर्डिंग स्टोअर होते. त्यामुळे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले नाहीत. हे वाचा -  एका लग्नाची अजब कहाणी; घोडा-कारऐवजी स्ट्रेचरवर लग्नमंडपात पोहोचला नवरदेव कारण… अमर उजाला च्या वृत्तानुसार पोलिसांनी जीवघेण्या हल्ल्याचा गुन्हा नोंदवला. आरोपीला कोर्टाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. हे सर्व मजेत करण्यात आलं की यामागे आणखी काही कारण होतं, हे नेमकं समजलं नाही आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात