अरे देवा! रोटी करताना अंदाज चुकला आणि काय घडलं पाहा VIDEO

अरे देवा! रोटी करताना अंदाज चुकला आणि काय घडलं पाहा VIDEO

देशात अनलॉक 5 चा टप्पा सुरू झाल्यानंतर बरेच छोटे-मोठे व्यवसाय पुन्हा नव्यानं सुरू झाले आहेत.

  • Share this:

मुंबई, 10 ऑक्टोबर : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे ठप्प झाले होते. आता पुन्हा हळूहळू सर्व सुरू होत आहे. अनेक महिने लॉकडाऊनमुळे हॉटेल्स आणि खानावळ बंद असल्यामुळे अनेक मजुरांचे आणि नागरिकांचं मोठं नुकसान झालं. कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले तर काही व्यवसाय पुन्हा हळूहळू सुरू करण्यात आले. या कोरोना काळतले किंवा त्यानंतरचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत पण त्याच दरम्यान एक गमतीशीर व्हिडीओ मात्र तुफान व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

एका हॉटेलमध्ये ऑर्डर तयार करताना हा तरुण आपली रोटी उचलून तव्यावर टाकतो मात्र त्याचा हा अंदाज चुकतो आणि रोजी थेट पंख्यावर जाते. या घटनेला लॉकडाऊनशी जोडण्यात आलं आहे. लॉकडाऊन लागलं आणि कामाची सवय सुटल्यामुळे हा अंदाज चुकला असं अनेक युझर्सनी या व्हिडीओबाबत म्हटलं आहे.

हे वाचा-11 फूट लांब अजगर झाला 8 वर्षांच्या चिमुकलीचा दोस्त, VIDEO पाहून व्हाल थक्क

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. देशात अनलॉक 5 चा टप्पा सुरू झाल्यानंतर बरेच छोटे-मोठे व्यवसाय पुन्हा नव्यानं सुरू झाले आहेत. त्याच दरम्यान हा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कधीचा आहे आणि कुठला आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. काही युझर्सनी हा व्हिडीओ जुना असल्याचा देखील दावा केला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 10, 2020, 2:40 PM IST

ताज्या बातम्या