मुंबई, 10 ऑक्टोबर : माणसं आणि प्राणी यांची मैत्री किती अतुट असते याचं अनेकदा उदाहरण पाहायला मिळतं. पाळीव प्राण्यां व्यतिरिक्तही जंगलातील प्राण्यांसोबत काहीवेळा घनिष्ट मैत्री होते आणि प्राण्यांनाही आपला छान लळा लागतो. पण एक अजब सरपटणारा प्राणी मित्र असेल तर. ज्या अजगराला पाहून किंवा ज्या अजगराचं नाव ऐकून काळजात धस्स होतं तो अजगर एका चिमुकलीचा चक्क मित्र झाला आहे. 8 वर्षांच्या चिमुकलीचा हा पिवळ्या रंगाच्या प्रजातीचा अजगर खास मित्र झाला आहे. या अजगरासोबत तिला पोहायला खूप आवडतं. जो अजगर नुसता दिसला किंवा आपल्या मुलांच्या जवळ आला तरी प्रत्येक आईच्या काळजाचं नुसतं पाणीपाणी होतं तिथे ही 8 वर्षांची चिमुकली या अजगरासोबत खेळताना पाहायला मिळते. या चिमुकलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
An eight-year-old Israeli girl’s favorite swimming buddy is her 11-foot yellow pet python called Belle https://t.co/XEsjdPQGam pic.twitter.com/V2IUna7T2F
— Reuters (@Reuters) October 8, 2020
everything's fun and games until little python gets hungry
— durgaaax (@issalilboi) October 9, 2020
The kind of snakes we can trust 😂
— Nishant Manghnani (@BackFrmOblivion) October 9, 2020
हे वाचा- भररस्त्यात वृद्धानं काढली बैलाची खोड, पुढे काय झालं पाहा थरारक VIDEO हा पिवळ्या रंगाचा अजगर जवळपास 11 फूट लांब असल्याची माहिती मिळत आहे. हा व्हिडीओ इस्रायलमधील असल्याची माहिती मिळाली आहे. रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार बेले असं या अजगराचं नाव आहे. पिवळ्या रंगाचा दिसणारा हा अजगर पाळीव प्राण्यांपैकीच एक असल्याचं त्या परिसरात मानलं जातं. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे या चिमुकलीनं अजगरासोबत अधिक वेळ घालवला आणि त्यांच्यात खूप चांगली मैत्री झाली. या 8 वर्षांच्या चिमुकलीला हा अजगर जराही इजा पोहोचवत नाही या उलट तिच्यासोबत स्विमिंगपूलमध्ये छान खेळत असल्याचं VIDEO मध्ये दिसून आलं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सोशल मीडियावर या व्हिडीओवर तुफान प्रतिक्रिया येत असल्याचं पाहायला मिळत आहे.