Home /News /viral /

अजबच! फक्त 180 रुपयांच्या चप्पल चोरीमुळे पोलीसही चिंतेत; तक्रार येताच सुरू केला तपास कारण...

अजबच! फक्त 180 रुपयांच्या चप्पल चोरीमुळे पोलीसही चिंतेत; तक्रार येताच सुरू केला तपास कारण...

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

180 रुपयांची चप्पल चोरी होताच व्यक्तीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

    विकास सिंह चौहान/भोपाळ, 06 मे : सामान्यपणे पैसे, दागिने, मोबाईल किंवा एखाद्या महागड्या वस्तूंची चोरी झाली आणि त्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली जात असल्याचं तुम्हाला माहिती आहे. पण कधी कुणी पोलिसात चप्पल चोरीची तक्रार नोंदवल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? सध्या मध्य प्रदेशमधील असंच एक प्रकरण चर्चेत आलं आहे. विशेष म्हणजे पोलिसांनीसुद्धा हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे (Police complaint about slippers stolen). चप्पल चोरी झाली की कुणीही साहजिकच दुसरी नवीन चप्पल खरेदी करतं. पण उज्जैन जिल्ह्यातील एका व्यक्तीने मात्र चप्पल चोरीनंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. खाचरोदच्या तारोद गावातील जितेंद्र बागरी यांनी आपल्या चप्पल चोरीची चापाखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या अर्जात त्यांनी आपल्या चपलेचा रंग, चपलेच्या कंपनीचं नाव आणि त्याची किंमतही दिली आहे. हे वाचा - Swiggy वरून ऑर्डर केली Coffee पण...; Delivery Boy चा प्रताप पाहून ग्राहक शॉक आता चप्पल तशी महागडी असेल तर गोष्ट वेगळी. पण ही चप्पल फक्त 180 रुपयांची आहे. इतक्या कमी किमतीच्या चपलेची तक्रार पोलीस ठाण्यात केल्याने साहजिकच कुणाला हसू आवरणार नाही. पण पोलिसांनी या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यांनी तातडीने पावलं उचलली आहे. याचं कारणही तसंच आहे. जितेंद्र बागरीने आपल्या तक्रार अर्जात म्हटलं आहे की, "माझ्या घरातून कुणीतरी माझी चप्पल चोरली आहे. एका अज्ञात चोराद्वारे चोरण्यात आलेल्या माझ्या चपलेमुळे मला एखाद्या प्रकरणात अडकवलं जाऊ शकतं. जर चोरट्यांनी माझ्या चपलेचा अयोग्य वापर केला तर त्यासाठी मी जबाबदार नसेल" हे वाचा - कामावरून निघाला आणि पालटलं नशीब; घरी पोहोचेपर्यंत करोडपती झाली व्यक्ती आता अशी तक्रार असेल तर ती गंभीरच आहे. त्यामुळे पोलीसही चिंतेत पडले आहेत. त्यांनी याबाबत तपास सुरू करून आवश्यक ती कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे.. चप्पल चोरीची पोलिसात तक्रार देण्याचं कदाचित हे पहिलं प्रकरण असावं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Madhya pradesh, Police, Police complaint

    पुढील बातम्या