दिवाळीआधी दोन मजुरांचं नशीब फळफळलं! खोदकाम करताना सापडले 2 मौल्यवान हिरे; वाचा किंमत

दिवाळीआधी दोन मजुरांचं नशीब फळफळलं! खोदकाम करताना सापडले 2 मौल्यवान हिरे; वाचा किंमत

या दोन्ही हिऱ्यांचा लिलाव होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर 12.5 टक्के रॉयल्टी वजा केल्यानंतर उर्वरित रक्कम या दोन कामगारांना देण्यात येईल.

  • Share this:

पन्ना, 04 नोव्हेंबर : मध्य प्रदेशतील पन्ना जिल्ह्यात दिवाळीआधी दोन मजुरांचं नशीब फळपळळं आहे. येथील जगप्रसिद्ध हिऱ्याच्या खाणीत दोन मजुरांना दोन मौल्यवान हिरे सापडले आहेत. डायमंड निरीक्षक अनुपम सिंह यांनी मंगळवारी सांगितले की, सोमवारी दोन कामगारांनी कार्यालयात दोन हिरे जमा केले. दिलीप मिस्त्री यांना कृष्णा कल्याणपूर भागातील जुरापूर खाणीतून 7.44 कॅरेटचा हिरा मिळाला आहे, तर लखन यादव यांना 14.98 कॅरेटचा हिरा मिळाला आहे.

सिंह म्हणाले की हिऱ्याची योग्य किंमत अधिकाऱ्यांकडून ठरविली जाईल. एका अंदाजानुसार 7.44 कॅरेटचा हिरा सुमारे 30 लाख रुपये असू शकतो तर 14.98 कॅरेटचा हिरा त्यापेक्षा दुप्पट असू शकतो. या दोन्ही हिऱ्यांचा लिलाव होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर 12.5 टक्के रॉयल्टी वजा केल्यानंतर उर्वरित रक्कम या दोन कामगारांना देण्यात येईल.

वाचा-डाळींच्या किंमती घसरल्या, 20 टक्क्यांपर्यंत झाल्या स्वस्त

दिवाळीआधी बदललं नशीब

हिरा मिळाल्यानंतर लखन यादव म्हणाले, “आम्ही आनंदी आहोत. मला प्रथमच हिरा मिळाला. ही देवाची देणगी आहे. मी एक छोटा शेतकरी आहे आणि माझ्याकडे दोन एकर जमीन आहे. डायमंड लिलावानंतर मिळालेल्या पैशांचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी होईल”. तर, दिलीप मिस्त्री म्हणाले,“ देवाच्या कृपेने मला प्रथमच हा दर्जेदार हिरा मिळाला आहे. या हिऱ्याच्याविक्रीतून मिळालेल्या पैशातून मी माझ्या मुलांची चांगली काळजी घेईन”.

वाचा-लिंबू, नारळ आणि घरातच भलामोठा खड्डा, उस्मानाबादेतील थरारक घटना उघड

याआधी एका कामगाराला मिळाले होते 3 हिरे

गेल्या महिन्यात पन्ना खाणींमध्ये एका मजुराला एकाच वेळी तीन हिरे मिळाले होते. हे हिरे 4.43, 2.16 आणि 0.93 कॅरेटचे होते. त्यांची अंदाजित किंमत अंदाजे 30 लाख इतकी होती. जारूपूरच्या उथळ डायमंड खाणीत हे हिरे सापडले.

Published by: Priyanka Gawde
First published: November 4, 2020, 11:11 AM IST

ताज्या बातम्या