जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 50 कोटींच्या आलिशान महालाला मिळेना ग्राहक! स्वप्नवत वाटणाऱ्या घराचं किचन पाहून छी थू करतात खरेदीदार!

50 कोटींच्या आलिशान महालाला मिळेना ग्राहक! स्वप्नवत वाटणाऱ्या घराचं किचन पाहून छी थू करतात खरेदीदार!

50 कोटींच्या आलिशान महालाला मिळेना ग्राहक! स्वप्नवत वाटणाऱ्या घराचं किचन पाहून छी थू करतात खरेदीदार!

राजवाड्यातली किचनची (Kitchen) विचित्र रचना बघून तो कोणीही घ्यायला तयार नाही. सोशल मीडियावर या अलिशान घराचे फोटो पाहून लोकांनी आश्चर्य व्यक्त करत, हा इंटिरिअरचा नेमका कोणता प्रकार आहे, असा प्रश्न विचारला आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मिनेसोटा, 05 मार्च: अलीकडच्या काळात लोक प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट (Property Investment) अर्थात मालमत्तेत गुंतवणूकीला अधिक महत्त्व देऊ लागले आहेत. यात गुंतवणूक करणं खूप फायदेशीर मानलं जातं. घर असो वा जमीन वेळेनुसार या मालमत्तेची किंमत वाढत जाते. त्यामुळे बरेच लोक यात पैसे गुंतवतात. फायद्याचा विचार करून अशाच एका कंत्राटदारानं (Contractor) अलिशान राजवाडा (Luxurious Palace) बांधला. खासगी बेटाच्या मधोमध बांधलेला हा राजवाडा आतून आणि बाहेरुन पाहिलात तर तो तुम्हाला स्वप्नातलं घर वाटेल. पण या राजवाड्यातली किचनची (Bad Kitchen Interior) विचित्र रचना बघून तो कोणीही घ्यायला तयार नाही. सोशल मीडियावर (Social Media Viral) या अलिशान घराचे फोटो पाहून लोकांनी आश्चर्य व्यक्त करत, हा इंटिरिअरचा नेमका कोणता प्रकार आहे, असा प्रश्न विचारला आहे. अमेरिकेतील मिनेसोटा येथील बाल्ड ईगल लेकमध्ये 2.3 एकरांवर वसलेला हा राजवाडा पाहून कोणाचेही डोळे विस्फारून जातील. सध्या हा राजवाडा 50 कोटींना विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा राजवाडा बाहेरून पाहिल्यावर प्रत्येकजण खरेदीसाठी तयार होतो. राजवाड्यातील खोल्याही सर्वांना भुरळ घालतात. पण लोक जेव्हा या राजवाड्यातलं किचन पाहतात, तेव्हा ते खरेदीचा विचार सोडून देतात. या अलिशान घराच्या बांधकामादरम्यान कंत्राटदाराकडून चूक झाली, त्यामुळे लोक हे घर विकत घेण्यास नकार देत आहेत. हे वाचा- सुपर मार्केटमधून आणली 1 डझन केळी, त्यात लपलेली भयंकर गोष्ट पाहून फुटला घाम या अलिशान राजवाड्यात 5 बेडरुम आहेत. त्याशिवाय 9 बाथरुम आणि 6 गॅरेज आहेत. त्यामुळे या वास्तूला स्वप्नातलं घरही (Dream Home) म्हणता येईल. परंतु, जोपर्यंत किचनमध्ये जात नाही, तोपर्यंत हे ड्रिम होम असल्याचं वाटतं. वास्तविक या राजवाड्यातल्या किचनमध्ये दोन पिलर अर्थात खांब आहेत. हे दोन्ही खांब किचनमधल्या पांढऱ्या टेबलाजवळ असून, यामुळे संपूर्ण घराचं सौंदर्य नष्ट झालं आहे. सोशल मीडियावर या घराचे फोटोज व्हायरल झाले आहेत. या किचनकडं लक्ष जाताच, हे कोणत्या प्रकारचं इंटिरिअर आहे, असा प्रश्न लोकांना पडत आहे. या अलिशान घराचे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की ‘कोणाला या स्वप्नातल्या घरात राहायला आवडेल?’ हे पाहून अनेकांनी अशा घरात राहायला आवडणार नाही,’ अशा कमेंट केल्या आहेत.

    News18

    ‘सुरुवातीला लोकांना हे अलिशान घर खूप आवडतं. पण जेव्हा त्यांची नजर घरातल्या किचनकडे जाते, तेव्हा त्यांचा विचार बदलतो’, असं हे घर विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिअल इस्टेट एजंट्सने सांगितलं. कंत्राटदाराची ही चूक त्यांना किती महागात पडते, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात